Numerology: वेळीच योग्य रस्त्यावर धावल्यानं कमी वयात मोठं यश; जन्मतारखेवरून असं निवडा करिअर

Last Updated:
Birth Date And Life: करिअर म्हणून आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, हे लवकर ठरवलं आणि त्या दिशेने एकसाथ प्रयत्न करत राहिल्यास यश लवकर मिळतं. कित्येक लोकांना वयाची फार वर्षे खर्ची गेल्यानंतरही आपण नेमकं काय करावं हे लक्षात येत नाही. अशा लोकांना साहजिकच सतत अपयश पाहावं लागतं, कारण ते चुकीच्या रस्त्यावर धावून आपली मेहनत वाया घालवत असतात. कोणाचीही जन्मतारीख त्या व्यक्तिच्या करिअरविषयी चांगली माहिती देऊ शकते. जन्मतारखेवरून करिअर निवडण्याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ.
1/9
मूलांक 1कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक या मूलांकाचे असतात. या मूलांकाचा ग्रह सूर्य आहे. हे लोक धाडसी, स्वतंत्र विचारांचे आणि प्रबळ इच्छाशक्तीचे असतात. स्वतःच्या बळावर पुढे जाण्याची ताकद त्यांच्यात असते. नेतृत्वगुण चांगले असल्यामुळे प्रशासन, सरकारी कामकाज, व्यवस्थापन अशा क्षेत्रात त्यांना यश मिळते. मात्र स्वतःचाच अहंकार, हट्ट आणि सगळं आपल्या मर्जीनुसार चालवायची सवय त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.

advertisement
2/9
मूलांक 22, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक या मूलांकाचे असतात. या मूलांकाचा ग्रह चंद्र आहे. हे लोक भावनिक, समजूतदार आणि नातेसंबंध जपणारे असतात. वाद मिटवणं, लोकांना एकत्र ठेवणं आणि वातावरणात संतुलन राखणं यात ते पटाईत असतात. कला, सजावट, जनसंपर्क, समुपदेशन, मुत्सद्देगिरी अशा क्षेत्रात त्यांना चांगलं यश मिळतं. पण जास्त भावनिक अवलंबित्व आणि आत्मविश्वासाची कमतरता यामुळे काही संधी हातून निसटू शकतात.

3/9
मूलांक 33, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक या मूलांकाचे असतात. या मूलांकाचा ग्रह गुरू आहे. हे लोक विचारशील, बोलके आणि सर्जनशील असतात. बोलण्यातून, शिकवण्यातून किंवा मार्गदर्शनातून लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची क्षमता असते. शिक्षण, प्रशासन, सल्लागार, न्याय, धर्म, सरकारी क्षेत्र अशा ठिकाणी यश मिळतं. मात्र सतत उपदेश देण्याची सवय आणि स्वतःलाच जास्त योग्य समजण्याची वृत्ती लोकांना दुरावू शकते.

4/9
मूलांक 44, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक या मूलांकाचे असतात. या मूलांकाचा ग्रह राहू आहे. हे लोक जमिनीशी जोडलेले, कष्टाळू आणि शिस्तप्रिय असतात. हळूहळू पण ठामपणे प्रगती करणं ही त्यांची खरी ताकद असते. तंत्रज्ञान, संशोधन, राजकारण, गुप्त किंवा वेगळ्या स्वरूपाच्या कामांमध्ये यश मिळू शकतं. मात्र आयुष्यात चढ-उतार, विरोधक आणि चुकीचे निर्णय यामुळे अडचणी येऊ शकतात.

5/9
मूलांक 55, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक या मूलांकाचे असतात. या मूलांकाचा ग्रह बुध आहे. हे लोक जिज्ञासू, सतत काहीतरी नवीन शिकणारे आणि बदल स्वीकारणारे असतात. संवादकौशल्य ही त्यांची मोठी ताकद आहे. व्यापार, विक्री, लेखन, मीडिया, प्रवास, शिक्षण, गणित अशा क्षेत्रात ते पुढे जातात. मात्र अस्थिर मन आणि अर्धवट काम सोडून देण्याची सवय यामुळे अडथळे येऊ शकतात.

6/9
मूलांक 66, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक या मूलांकाचे असतात. या मूलांकाचा ग्रह शुक्र आहे. हे लोक प्रेमळ, जबाबदार आणि सेवाभावी असतात. कुटुंब, नाती आणि समाज यांच्याप्रती त्यांची बांधिलकी जास्त असते. फिल्म, संगीत, सौंदर्य, डिझाइन, फॅशन, हॉटेल, सामाजिक काम अशा क्षेत्रात यश मिळतं. मात्र जास्त खर्च, चैन आणि नात्यांमधील भावनिक गुंतागुंत यामुळे त्रास होऊ शकतो.

7/9
मूलांक 77, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक या मूलांकाचे असतात. या मूलांकाचा ग्रह केतू आहे. हे लोक अंतर्मुख, आध्यात्मिक आणि विचारशील असतात. जीवनाचा खोल अर्थ शोधण्याकडे त्यांचा कल असतो. ध्यान, अध्यात्म, संशोधन, मानसशास्त्र, परदेशी काम अशा क्षेत्रात ते यशस्वी होतात. पण जास्त एकटेपणा, अस्थिर विचार आणि व्यवहारज्ञानाची कमतरता यामुळे अडचणी येऊ शकतात.

8/9
मूलांक 88, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक या मूलांकाचे असतात. या मूलांकाचा ग्रह शनी आहे. हे लोक मेहनती, शिस्तबद्ध आणि चिकाटीने काम करणारे असतात. सुरुवातीला संघर्ष असतो, पण हळूहळू स्थिर आणि मोठं यश मिळतं. कायदा, न्याय, उद्योग, व्यवस्थापन, श्रम आणि सेवा क्षेत्रात प्रगती होते. उशिरा का होईना, पण आयुष्यात मोठ्या उपलब्धी मिळतात.

9/9
मूलांक 99, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक या मूलांकाचे असतात. या मूलांकाचा ग्रह मंगळ आहे. हे लोक धाडसी, मानवतावादी आणि इतरांसाठी झटणारे असतात. सेवा, संरक्षण आणि नेतृत्व यात ते पुढे असतात. सेना, पोलीस, खेळ, इंजिनिअरिंग, राजकारण, तंत्रज्ञान, बांधकाम क्षेत्रात यश मिळतं. मात्र राग, घाई आणि अधीरपणा यावर नियंत्रण ठेवलं नाही तर नुकसान होऊ शकतं. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मूलांक 99, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक या मूलांकाचे असतात. या मूलांकाचा ग्रह मंगळ आहे. हे लोक धाडसी, मानवतावादी आणि इतरांसाठी झटणारे असतात. सेवा, संरक्षण आणि नेतृत्व यात ते पुढे असतात. सेना, पोलीस, खेळ, इंजिनिअरिंग, राजकारण, तंत्रज्ञान, बांधकाम क्षेत्रात यश मिळतं. मात्र राग, घाई आणि अधीरपणा यावर नियंत्रण ठेवलं नाही तर नुकसान होऊ शकतं.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement