Pune : बंडू आंदेकरच्या डोक्यावर कोणत्या पक्षाचा हात? कल्याणी कोमकरचा खळबळजनक आरोप! अजितदादांना केली खास विनंती

Last Updated:

Pune Kalyani Komkar News : बंदू आंदेकरच्या डोक्यावर कोणत्या पक्षाचा हात आहे? असा सवाल देखील कल्याणीने विचारला. अजित पवार यांना मदत करतात, असं मी म्हणू शकते, असंही कल्याणी (Kalyani Komkar on Bandu andekar) म्हणाली.

Kalyani Komkar Question on bandu andekar election Application slam ajit pawar
Kalyani Komkar Question on bandu andekar election Application slam ajit pawar
Pune gang war in PMC Election : पुण्याचा कुख्यात गँगस्टर बंडू आंदेकर याला पुणे महानगरपालिकेसाठी निवडणुकीचा अर्ज भरण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. त्यावर आता आयुष कोमकरची आई कल्याणीने आपलं मत व्यक्त केलं आहे. कोर्टाने बंडू आंदेकरांना परवानगी का दिली गेली? हे मला कळालं नाही. बंडूने बाहेर येऊन घोषणाबाजी करून प्रचार केला आहे. शिवाय अर्ज पण चुकीचा भरला. त्यांनी हे सर्व मुद्दामहून केलं. पोलिसांनी देखील त्यांना अडवलं नाही. यांना एवढी पॉवर येते कुठून. यांना अर्ज भरण्याची परवानगी द्यायला नको होती. लोकांना आता ठरवायचंय, त्यांना निवडून द्यायचं की नाही. लोकांनी डोळे उघडावे. कुठल्याही पक्षाने त्यांना तिकीट द्यायला नको होतं.

मी अजितदादांना मागणी करतीये की...

मी देखील निवडणूक लढणार आहे. मी तसा अर्ज भरला होता शिवसेनेचा पण अजून तिकीट मिळणार की नाही, याची माहिती नाही. पण मला वाटतं की मी अन्यायाविरुद्ध लढतीये. मी अन्याय आता सहन करू शकत नाही. मी अजितदादांना मागणी करतीये की, यांना उमदेवारी देऊ नका. अजितदादा म्हणतात की, कोयता गँग थांबायला पाहिजे, गँगवॉर थांबायला पाहिजे अन् त्यांना तिकीट देतात, असंही कल्याणी कोमकर यांनी म्हटलं आहे.
advertisement

बंडू आंदेकरच्या डोक्यावर कोणत्या पक्षाचा हात?

बंडू आंदेकरचे पैसे सील केले. पण अर्ज भरायला यांच्याकडे पैसे कुठून आले. बंडू आंदेकरच्या डोक्यावर कोणत्या पक्षाचा हात आहे? असा सवाल देखील कल्याणीने विचारला. अजित पवार यांना मदत करतात, असं मी म्हणू शकते. त्यांची पॉवर आता ऐवढी वाढलीये, त्यामुळे त्यांच्यावर कुठल्या तरी मोठ्या लोकांचा हात आहे. जर अजितदादांना त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्षाबाहेर आत्मदहन करेन, असंही कल्याणी म्हणाली.
advertisement

अजितदादांची भेट घेणं सोपं नाही म्हणून....

माझ्या मुलाचं आयुष्य उद्धवस्त केलं. मी त्यांना सोडणार नाही. मी न्याय मागणार. आम्हाला एक संधी द्यावी, एका आईच्या पाठीशी उभं रहावं असं मला वाटतं. अजितदादांची भेट घेणं सोपं नाही म्हणून त्यांना भेटणं झालं नाही. मी फॉर्म भरणार आहे की नाही, याबाबत मला खात्री नाही. आम्ही आमच्या भावाची सुपारी का देऊ? यातून आम्हाला काय फायदा होणार? असा सवाल वनराजच्या मर्डरवर कल्याणीने केलाय.
advertisement

बंडूला अपक्ष लढू द्या पण...

दरम्यान, माझ्या मुलाची कोणाशी भांडणं नव्हती. बंडूला अपक्ष लढू द्या पण सत्तेच्या पक्षाने त्यांना तिकीट द्यायला नको. गणेश काळेचा देखील खून केला. लोकांची घरं उद्धवस्त झालं. अर्ज भरायला आले तर गपचूप अर्ज भरायला पाहिजे होता. विजय निंबाळकर, निखील आखाडे, गणेश काळे आणि आयुष कोमकर यांची हत्या बंडू आंदेकरने केलीये, असा आरोप देखील कल्याणी कोमकरने केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : बंडू आंदेकरच्या डोक्यावर कोणत्या पक्षाचा हात? कल्याणी कोमकरचा खळबळजनक आरोप! अजितदादांना केली खास विनंती
Next Article
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray: जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?
जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदे
  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.

  • जागा वाटपात स्थानिक पातळीवर काही जागांवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आग्रही आह

  • शिवसेना ठाकरे गटाच्या सगळ्या शाखा प्रमुखांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे.

View All
advertisement