नवऱ्याच्या निधनानंतर रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली, पण ज्याची भीती तेच घडलं... पुणे हादरलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
रूपालीच्या पतीचे निधन झाल्यानंतर ती काही काळ नातेवाईकांकडे राहत होती.
पुणे : खेड तालुक्यातील शिरोली येथे अनैतिक प्रेमसंबंधांच्या कारणावरून एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रूपाली विलास वाडेकर (वय 46, रा. कल्याण, जि. ठाणे) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी ललित दिपक खोल्लम (वय 37, रा. शिरोली) याच्या फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली. काही दिवसांपासून रूपाली आरोपीच्या घरी राहत होती. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र वारंवार वाद होत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ललितच्या फ्लॅटमधून जोरात भांडणाचा आवाज येत होता. साधारण 11.20 च्या सुमारास घरातून मोठा आवाज आल्यानंतर त्यांच्या लक्षात काहीतरी बिनसल्याचे आले. त्यानंतर रूपाली यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. तिचा गळा धारदार हत्याराने चिरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
आरोपीचा गुन्हेगारीचा इतिहास
या प्रकरणी पोलीस हवालदार सुदर्शन सुखदेव माताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ललित खोल्लम याच्याविरोधात भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली आणि ललितचे प्रेमसंबंध ठाण्यात असताना जुळले होते. रूपालीच्या पतीचे निधन झाल्यानंतर ती काही काळ नातेवाईकांकडे राहत होती. काही महिन्यांपूर्वी ती शिरोली येथे आली आणि आरोपीसोबत राहत होती. ललित खोल्लम याचा यापूर्वीही गुन्हेगारी इतिहास असून त्याने एका प्रकरणात तुरुंगवास भोगल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
आरोपी फरार
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे यांनी गुन्हा नोंदवला असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. प्रेमसंबंधातून जन्मलेल्या या हत्याकांडामुळे शिरोली परिसरात तणाव व भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
advertisement
हे ही वाचा :
शाळेतील मैत्रीण, लग्नानंतर सूत जुळलं, प्रेमासाठी नवऱ्याला सोडलं पण.., पुण्याची तरुणी आयुष्यातून उठली
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 16, 2025 5:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
नवऱ्याच्या निधनानंतर रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली, पण ज्याची भीती तेच घडलं... पुणे हादरलं


