Pune Crime : घायवळ टोळीवर पुणे पोलिसांनी कारवाई! जिथं गोळीबार केला तिथंच उतरवला माज, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime News : पुण्यातील कोथरूड येथील मुठेश्वर परिसरात सामान्य नागरिकांवर गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या घायवळ गँगच्या पाच आरोपींना पुणे पोलिसांनी धडा शिकवला आहे.
Pune Kothrud firing case : पुण्यातील कोथरूड येथील मुठेश्वर परिसरात एका 36 वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरूणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या दोन्ही घटनेनंतर घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याची चर्चा सुरू झाली असताना पुणे पोलिसांवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुणे पोलिसांनी घायवळ टोळीचा माज उतरवलाय.
जिथं गोळीबार केला तिथंच....
सामान्य नागरिकांवर गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या घायवळ गँगच्या पाच आरोपींना पुणे पोलिसांनी धडा शिकवला आहे. ज्या ठिकाणी त्यांनी गोळीबार केला होता, त्याच ठिकाणी पोलिसांनी या पाचही आरोपींची धिंड काढली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या पाचही आरोपींना गोळीबार झालेल्या ठिकाणी नेलं. सार्वजनिक ठिकाणी त्यांची धिंड काढून, त्यांच्या गुंडगिरीचा आणि माजोरीचा माज उतरवला.
advertisement
भाईगिरी कराल तर सुट्टी नाही
कोथरूडमधील या घटनेमुळे पुणे पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या हे पाचही आरोपी पोलीस कोठडीत असून, पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे आता पुण्यात भाईगिरी कराल तर सुट्टी नाही, असा संदेश पुणे पोलिसांनी दिला आहे.
advertisement
जिथं गोळीबार केला तिथंच घायवळ टोळीचा उतरवला माज pic.twitter.com/ZEbJSQ80I2
— News18Lokmat (@News18lokmat) September 21, 2025
नीलेश घायवळचा हात?
दरम्यान, या प्रकरणात नीलेश घायवळ याचा काही हात आहे का? याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. नीलेश बन्सीलाल घायवळ पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील असून तो उच्चशिक्षित देखील आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या ऐवजी त्याने गुन्हेगारीचा रस्ता पकडला होता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 21, 2025 11:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : घायवळ टोळीवर पुणे पोलिसांनी कारवाई! जिथं गोळीबार केला तिथंच उतरवला माज, पाहा Video