घरासमोर झोपलेला कुत्रा अचानक गायब झाला, CCTV पाहून सर्वांना घाम फुटला; पुण्यातील भयानक VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
कुत्र्यासोबत रात्री जे घडलं ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. हे दृश्य धक्कादायक आहे.
रायचंद शिंदे/पुणे : जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. घरासमोर झोपलेला एक कुत्रा अचानक गायब झाला आहे. कुत्र्यासोबत नेमकं काय घडलं हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सर्वांना घाम फुटला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालासुद्धा धडकी भरेल.
आंबेगाव तालुक्यातील ढोबळेवाडी- जारकरवाडी इथली ही घटना आहे. इथं राहणारे उद्योजक अविनाश बाबुराव ढोबरे यांच्या घरासमोर एक कुत्रा झोपला होता. हा कुत्रा अचानक गायब झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असतात, त्यात जे दिसलं ते धक्कादायक होतं.
एका बिबट्याने या कुत्र्याची शिकार केली. व्हिडीओत बिबट्या कुत्र्यावर हल्ला करताना दिसला. बिबट्याने कुत्र्याला जबड्यात धरून ओढत नेलं आहे.
advertisement
झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/O0XjHiPfnB
— News18Lokmat (@News18lokmat) February 24, 2024
नाशकातही बिबट्याने केली होती कुत्र्याची शिकार
याआधी नाशकातही घराच्या आवारात बसलेल्या एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होत. नाशिकच्या मुंगसरे गावात ही घटना घडली आहे. शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारात पाळीव कुत्रा रात्रीच्या सुमारास बसलेला होता. तितक्यात बिबट्या तिथं आला. यावेळी किशोर उगले यांच्या पाळीव कुत्र्याने त्या बिबट्याला चकवा दिला. मात्र, त्यानंतर बिबट्याने कुत्र्यावर झडप घेतली. बिबट्याने कुत्र्यावर झडप घेतल्यानंतर कुत्र्यानेही या बिबट्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मात्र, या हल्ल्यात कुत्र्याचा बळी गेला. गावात शिरुन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद झाली. सीसीटीव्हीत दिसत आहे की, एक कुत्रा घराच्या आवारात असलेल्या छोट्या कट्ट्यावर बसलेला आहे. काही सेकंदातच सीसीटीव्हीत बिबट्याही दिसतो. तितक्यात कुत्रा बिबट्याला पाहून चकवा देतो आणि घराच्या आवारात उडी घेतो. त्यानंतर बिबट्या त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करतो. पण कुत्रा त्याला चकवा देत पुन्हा कठड्यावर उडी घेतो. यानंतर बिबट्या कुत्र्यावर झडप घेतो.
advertisement
#WATCH | Leopard entered a residential area in Mungsare village of Nashik, attacked a pet dog yesterday
(Source: CCTV) pic.twitter.com/OznDoeQvHR
— ANI (@ANI) June 6, 2022
एएनआयने हा व्हिडीओ पोस्ट केला होता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 24, 2024 10:34 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
घरासमोर झोपलेला कुत्रा अचानक गायब झाला, CCTV पाहून सर्वांना घाम फुटला; पुण्यातील भयानक VIDEO








