Pune News: बापरे... 22 हजार पुणेकरांना कुत्र्याचा चावा,आकडेवारी पाहून बसला धक्का
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पालिकेनं बंदोबस्त केला नाही तर पालिकेतच भटकी कुत्री आणून सोडू, अशा इशारा राष्ट्रवादीच्या रुपाली पाटीलने दिला आहे.
पुणे : पुण्यात भटक्या कुत्र्यांनी चिमुरड्यावर जीवघेणा हल्ला केल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेला आलाय. विशेष म्हणजे स्थानिक रहिवाशांनी एक महिन्यापूर्वीच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले असून, स्थानिक प्रशासनाच्या उपाययोजना कमी पडत आहेत. गेल्या पाच वर्षांत एकट्या पुणे शहरात तब्बल 22 हजार डॉग बाईट्सच्या घटना नोंद झाल्यात.
पुण्यातील आंबेपठार भागात भटक्या कुत्र्यांनी एका चिमुरड्यांवर जीवघेणा हल्ला केल्याने या बाळाला तब्बल 40 टाके पडलेत.पण पालिकेनं जर या भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त केला असता तर कदाचीत या चिमुरड्यावरचा हल्ला झालाच नसता, अशी खंत स्थानिक रहिवाशांनी बोलून दाखवली. दरम्यान हा डॉग बाईटचा प्रकार समोर येतात रहिवाशांनी खासगी डॉगस्कॉडला पाचारण करून 7 कुत्री पकडूनही नेली. पण हल्ला करणारी कुत्री अजूनही मोकाट असल्याने परिसरात भीतीचं सावट कायम आहे. म्हणूनच पालिकेनं बंदोबस्त केला नाही तर पालिकेतच भटकी कुत्री आणून सोडू, अशा इशारा राष्ट्रवादीच्या रुपाली पाटीलने दिला आहे.
advertisement
हजारोंच्यावर चिमुकल्यांर हल्ले
श्वान प्रेमींच्या हट्टामुळे पालिकेला भटकी कुत्री पकडून नेता येत नसल्याने नसबंदीचा पर्याय पुढे आलाय पण खासगी संस्थामार्फत 37 हजार कुञ्यांची नसबंदी केली गेल्याचा दावा पालिका करतेय मग तरीही डॉग बाईट्सच्या संख्या का कमी होत नाही? असा प्रश्न पुणेकर विचारताहेत. याचाच दुसरा अर्थ असाही निघू शकतो की, खासगी संस्थांमार्फत फुगवून दाखवली जाणारी श्वान नसबंदीची आकडेवारीच बोगस आहे. कारण गेल्या पाच वर्षांत एकट्या पुणे शहरात तब्बल 22 हजार डॉग बाईट्सच्या घटना नोंद झाल्यात. अगदी गेल्या नोव्हेंबर महिन्यातच हा आकडा 2225 इतका आहे. याचाच अर्थ पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या आजही हजारोंच्यावर आहे त्यातूनच हे असे चिमुरड्यांवर हल्ले होत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 21, 2024 8:22 PM IST