Pune News: सायंकाळची वेळ; शेतात गेलेल्या तरुणावर बिबट्याची अचानक झडप, पण शेवट वेगळाच

Last Updated:

शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भोंडवे वस्तीतील एका तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केला.

बिबट्याचा हल्ला (फाईल फोटो)
बिबट्याचा हल्ला (फाईल फोटो)
पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांना बिबट्याचं दर्शन होत आहे. अनेत घटनांमध्ये तर बिबट्याने माणसांवर हल्लाही केला आहे. यातल्या काहींनी बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीवही गमावला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा परिसरात बिबट्याचा वाढता वावर पुन्हा एकदा धोकादायक ठरला आहे. शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भोंडवे वस्तीतील एका तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केला.
यश गणेश भोंडवे नावाचा हा तरुण आपल्या शेतातील गाईंना घेऊन परत येत असताना बिबट्याने पाठीमागून त्याच्यावर झडप घातली. या हल्ल्यात यश भोंडवे याच्या कान आणि हाताला गंभीर ओरखडे आणि जखमा झाल्या आहेत. बिबट्याने हल्ला करताच यश भोंडवे यांनी त्वरित आरडाओरड सुरू केला. त्याच्या मोठ्या आवाजामुळे बिबट्या घाबरून पळून गेला. परिणामी, मोठी हानी टळली आणि तरुणाचा जीव वाचला.
advertisement
जखमी अवस्थेतील यश भोंडवेला त्वरित ग्रामस्थांच्या मदतीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे निमगाव खंडोबा आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेमुळे शेतीच्या कामासाठी आणि जनावरांना चारा-पाणी आणण्यासाठी शेतकरी सायंकाळच्या वेळेत बाहेर पडण्यास घाबरत आहेत.
advertisement
वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. सायंकाळी नागरिकांनी घराबाहेर पडताना अधिक दक्षता घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
औंधमध्ये दिसला बिबट्या -
आता पुणे शहरातील नागरिकांच्या मनातही बिबट्याची दहशत बसली आहे. कारण पुणे शहरातील औंध भागात बिबट्याचे दर्शन झाले आहे. पहाटेच्या सुमारास एका सोसायटीच्या आसपास बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थानिकांना बिबट्या आढळून आल्याने पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाकडून आणि रेस्क्यू टीमकडून बिबट्याच्या शोध सुरू आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: सायंकाळची वेळ; शेतात गेलेल्या तरुणावर बिबट्याची अचानक झडप, पण शेवट वेगळाच
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement