PMP Bus Pune : आता वाहतुकीचे नियम मोडाल तर खबरदार, पीएमपी चालकांसानाही बसणार दंड, अशी आहे नियमावली

Last Updated:

पीएमपी चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बस चालकांनी बस चालवताना वाहतुकीचे नियम मोडल्यास, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास वा प्रवाशांशी गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे.

बस 
बस 
पुणे : पीएमपी चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस चालकांनी बस चालवताना वाहतुकीचे नियम मोडल्यास, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास वा प्रवाशांशी गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे पीएमपी चालकांना या नियमांचे पालन करूनच बस चालवावी लागणार आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बससेवा चालवली जाते. नागरिक मंच, सामाजिक संस्था, प्रवासी संघटनांकडून बस चालकांच्या वर्तनाविषयी वेळोवेळी तक्रारी करण्यात येतात. या तक्रारींची गंभीर दखल घेत पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोल-मुंडे यांनी कडक सूचना जारी केल्या आहेत.
advertisement
प्रशासनाचे निर्देश:
बस चालवताना मोबाइलवर बोलणे सक्त वर्ज्य
वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक
चालक व कंडक्टरने धूम्रपान करू नये
बस निर्धारित लेनमध्येच चालवावी
स्टॉप ओलांडल्यानंतर प्रवाशांना चढू देऊ नये
भरधाव वेगाने बस न चालवावी
प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे
advertisement
या नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रथम दोषी चालकावर रुपये 2000 दंड आकारण्यात येईल. तसेच नियम मोडत राहिल्यास त्याला निलंबित केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या सूचनांमुळे पीएमपी बससेवेची शिस्त आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
 
view comments
मराठी बातम्या/पुणे/
PMP Bus Pune : आता वाहतुकीचे नियम मोडाल तर खबरदार, पीएमपी चालकांसानाही बसणार दंड, अशी आहे नियमावली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement