advertisement

Pune Traffic Changes: पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे बघा! रमजान ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Last Updated:

रमजान ईदनिमित्त शनिवारी (दि. २१) लष्कर भागातील इदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.

वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
पुणे: रमजान ईदनिमित्त शनिवारी (दि. २१) लष्कर भागातील इदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात होणारी संभाव्य गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गोळीबार मैदान चौक आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत.
शनिवारी सकाळी ६ ते साडेअकरा वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
वाहतुकीतील प्रमुख बदल आणि पर्यायी मार्ग:
जड वाहनांसाठी मार्ग: सोलापूर रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणारी जड वाहने भैरोबा नाला चौकातून वानवडी आणि लुल्लानगरमार्गे वळवण्यात आली आहेत.
हलकी वाहने: शहरात किंवा स्वारगेटकडे येणाऱ्या वाहनचालकांनी भैरोबा नाला, एम्प्रेस गार्डन आणि घोरपडी मार्गाचा वापर करावा.
advertisement
पूर्णपणे बंद रस्ते: मम्मादेवी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद असेल. तसेच, सोलापूर बाजार पोलीस चौकी ते गोळीबार मैदान हा रस्ताही बंद राहील.
स्वारगेटकडून हडपसरकडे जाणारी वाहतूक: या मार्गावरील वाहनांनी सात लव्हज (चिमणराव ढोले पाटील) चौकातून गुलटेकडी आणि सॅलिसबरी पार्क मार्गे पुढे जावे.
लष्कर भागातील बदल: सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहनचालकांनी खटाव बंगला चौकातून नेपियर रस्ता किंवा बिशप स्कूल मार्गाचा वापर करावा.
advertisement
नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी, जेणेकरून सणाच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic Changes: पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे बघा! रमजान ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; 'हे' आहेत पर्यायी मार्ग
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement