advertisement

पुण्यात पोलिसांनी रिक्षा अडवली; आत सापडलं असं काही की सगळेच थक्क, चालकाला अटक

Last Updated:

रिक्षाचालक असलेला बागवान हा अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बागवान हा गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावर मेफेड्रोनची विक्री करण्यासाठी येणार होता

रिक्षाचालकाला अटक
रिक्षाचालकाला अटक
पुणे : पुणे शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका रिक्षाचालकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून 6 लाख 18 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम मेफेड्रोन आणि वाहतुकीसाठी वापरलेली रिक्षा असा एकूण 7 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अदिल करिम बागवान (वय ३५, रा. येवलेवाडी) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. रिक्षाचालक असलेला बागवान हा अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बागवान हा गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावर मेफेड्रोनची विक्री करण्यासाठी येणार होता. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आढळून आलं. पोलिसांनी मेफेड्रोनसह त्याची रिक्षा आणि मोबाईलदेखील जप्त केला आहे.
advertisement
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, संदीप शिर्के यांच्यासह अंमोल सरडे, सचिन मावळे, दयानंद तेलंगे-पाटील, विठ्ठल साळुंखे, नीलेश जाधव, रिहान पठाण, आशा भिंगारे, विद्या सावंत यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे. या रॅकेटचे जाळे अधिक मोठे असण्याची शक्यता आहे. आरोपी बागवान याने हे मेफेड्रोन नेमके कोणाकडून खरेदी केले आणि तो पुण्यात कोणाकोणाला विक्री करणार होता, या मुख्य दिशेने पोलीस कसून तपास करत आहेत.
advertisement
SBI चा अधिकारीच निघाला चोर!
नुकतंच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात आर्थिक पात्रता नसलेल्या ग्राहकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान गाड्यांच्या खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुण्यात 12 ठिकाणी मोठी छापेमारी केली. या घोटाळ्यात मनी लाँड्रिंग झाल्याचं उघडकीस आल्यानं ईडीने तपास सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार स्टेट बँकेचा तत्कालीन मुख्य व्यवस्थापक अमर कुलकर्णी हा आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात पोलिसांनी रिक्षा अडवली; आत सापडलं असं काही की सगळेच थक्क, चालकाला अटक
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement