Pune Sarasbaug : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटला राडा! पोलिसांसमोर 2 गटात तुफान हाणामारी, पाहा Video

Last Updated:

Pune Sarasbaug Diwali Pahat : पुण्यात दिवाळी पाडवा पहाटचा उत्सव सारसबागेत आयोजित केला जातो. मात्र, यंदाच्या वर्षी सारसबागेत दोन गटात वाद पेटल्याचं पहायला मिळालं. कार्यक्रमावेळी राडा झाला.

Pune Sarasbaug Diwali Pahat
Pune Sarasbaug Diwali Pahat
Pune Sarasbaug Diwali Pahat : गेल्या 28 वर्षांपासून पुण्यातील सारसबागेतील दिवाळी पहाटचा कार्यक्रम यंदाच्या वर्षी देखील आयोजित केला होता. हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या तीव्र विरोधामुळे आणि समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या धमकीवजा इशाऱ्यामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, पुणे पोलिसांनी यात मध्यस्थी केल्यानंतर हा कार्यक्रम होणार असल्याचं आयोजकांनी जाहीर केलं. अशातच आता सारसबागेतील कार्यक्रमात राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे.

सारसबागच्या कार्यक्रमाला गालगोट

पुण्यात दिवाळी पाडवा पहाटचा उत्सव सारसबागेत आयोजित केला जातो. मात्र, यंदाच्या वर्षी सारसबागेत दोन गटात वाद पेटल्याचं पहायला मिळालं. कार्यक्रमावेळी राडा झाला. त्यामुळे सारसबागच्या दिवाळी पहाटच्या अभूतपूर्व कार्यक्रमाला गालगोट लागल्याचं चित्र यंदा पहिल्यांदाच पहायला मिळालं आहे. त्याचा व्हिडीओ देखील सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

धक्का लागल्याने दोन गटात हाणामारी

advertisement
पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याचे आश्वासन दिल्यानंतर आयोजकांकडून कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. तर सारसबागेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. एकमेकांना धक्का लागल्याने दोन गटात हाणामारी झाली. मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रकरण मिटवलं. चार ते पाच जणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा Video

advertisement
दरम्यान, आमचा दिवाळी पहाट कार्यक्रमाला विरोध नाही मात्र त्या कार्यक्रमात घुसणाऱ्या जिहद्दी व्यक्तीच्या लोकांना विरोध आहे. त्यासाठी आम्ही हिंदूंना इकडे येण्याचा आवहान केला आहे .उद्या आम्ही कार्यक्रम सहभागी होणार आणि जर काही चुकीचे झालं तर आमच्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार असा इशारा हिंदू संघटनांनी दिला होता.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Sarasbaug : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटला राडा! पोलिसांसमोर 2 गटात तुफान हाणामारी, पाहा Video
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement