Pune : लिंबू-अंडी आणि रक्तासारखी रेषा; शाळेतल्या प्रकारानं पुण्यात खळबळ, नेमकं काय घडलं?
Last Updated:
Pune Shocking News : पुण्याच्या एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जिथे सकाळी विद्यार्थी आणि पालक शाळेच्या गेटवरच पोहचताच त्यांच्या पाया खालची जमीन सरकरली. नेमकं शाळेत काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या.
पुणे : पुणे या शहराला कायम विद्येचे माहेरघर म्हटलं जाते. मात्र याच शहरात एक अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. पुण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या गेटजवळ जादूटोणा करत उतारा करून टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घडलेल्या या प्रकरामुळे विद्यार्थी आणी पालकांमध्ये प्रचंड भीती पसरलेली आहे.
विद्येच्या माहेरघरात काळं सावट!
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील टाकवे बुद्रूक येथील एका शाळेच्या गेटजवळ हा प्रकार घडला होता. जिथे सकाळी विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत येताच हा प्रकार उघडकीस आहे. गेटजवळ लिंबू, अंडी, कुंकू आणि चुन्याच्या पुड्या टाकून तिथं गोलाकार चिन्ह काढलं होतं.
घाबरलेल्या पालकांनी तात्काळ हा प्रकार पोलिसांना कळवला असून असा प्रकार कोणी केला याबाबत अजूनही समजले नाही. मात्र या प्रकरणी प्रशासनाने योग्य तो तपास करुन त्या व्यक्तीविरोद्धात कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 8:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : लिंबू-अंडी आणि रक्तासारखी रेषा; शाळेतल्या प्रकारानं पुण्यात खळबळ, नेमकं काय घडलं?


