Dal Recipe Video : प्राचीन काळी डाळ कशी बनवायचे? 5000 वर्षे जुनी रेसिपी
- Published by:Priya Lad
Last Updated:
How to make dal recipe : प्राचीन भारतात डाळ कशी बनायची याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. प्राचीन काळातील डाळीची ही रेसिपी इतकी वेगळी आहे की तुम्ही विचारही केला नसेल.
नवी दिल्ली : डाळ हा आपणा भारतीय आहारातील महत्त्वाचा पदार्थ. मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ... अशा कितीतरी डाळी. देशात कुठेही जा तुम्हाला डाळ मिळेल. भले ते बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की प्राचीन भारतात किंवा राजा-महाराजांच्या काळात डाळ कशी बनत असावी?
प्राचीन भारतात डाळ कशी बनायची याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. प्राचीन काळातील डाळीची ही रेसिपी इतकी वेगळी आहे की तुम्ही विचारही केला नसेल. यात डाळ म्हणजे अख्ख्या मुगाला म्हटलं आहे. व्हिडीओत सांगितल्यानुसार हे अख्खे मूग एक प्रहर म्हणजे 3 तास आंबट ताकात भिजवून ठेवायचे आहेत.
advertisement
आता एका भांड्यात तूप घ्या. तूप गरम झालं की त्यात भिजवलेले मूग टाका. मध्यम आचेवर परतवून घ्या. डाळ नीट परतवून घेतली एका ताटात काढून थंड करून घ्या. त्यानंतर जी जाडसर वाटून घ्या. आता भांडं पुन्हा गॅसवर ठेवा. त्यात थोडं तूप टाका. तूप गरम झालं की जिऱ्याची फोडणी द्या. वरून वाटलेली डाळ आणि आवश्यक तितकं पाणी टाका. आता यात हळद, काळी मिरी, हिंग, मीठ टाकून ढवळा. आता यात ताक टाका आणि डाळीला उकळी येईपर्यंत ढवळत राहा जेणेकरून डाळ ताकामुळे फुटणार नाही. शेवटी पर्पटक नावाचं गवत टाकण्यात आलं आहे. झाकण ठेवून शिजायला ठेवा.
advertisement
कोणताही पदार्थ चविष्ठ असल्या सुगंधाशिवाय पूर्ण नाही. त्यामुळे शेवटी भीमसेनी कपूर चिमूटभर टाका. एकदा ढवळा आणि मुगाची डाळ तयार.
@tarunguptaphotography या युट्यब चॅनेलवर पाकदर्पणअंतर्गत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत सांगितल्यानुसार हे रेसिपी एका संस्कृत पुस्तकातून घेण्यात आली आहे.
advertisement
तुम्ही आजवर पारंपारिक पद्धत, नवीन पद्धत, आधी फोडणी देऊन, वरून फोडणी देऊन अशा वेगवेगळ्या पद्धतीने डाळ बनवली असेल पण आता एकदा 5000 वर्षे जुनी डाळीची रेसिपी ट्राय करा, अशा पद्धतीने डाळ बनवा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 26, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Dal Recipe Video : प्राचीन काळी डाळ कशी बनवायचे? 5000 वर्षे जुनी रेसिपी


