advertisement

MMRDA मध्ये जम्बो भरती; 1,77,500 पर्यंत मिळणार पगार, इथं करा अर्ज!

Last Updated:

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) राज्यातल्या तरूणांसाठी बंपर नोकरभरती केली जाणार आहे. कोणकोणत्या रिक्त पदांसाठी आणि किती रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, जाणून घेऊया...

News18
News18
मुंबई: राज्यातल्या तरूणवर्गासाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल. एमएमआरडीएमध्ये राज्यातल्या तरूणांसाठी बंपर नोकरभरती केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये (MMRDA) गट- अ, गट- ब आणि गट- क अशा वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 235 पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती केली जात असून परीक्षा शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच भरला जात आहे. एमएमआरडीएच्या कोणकोणत्या पदांसाठी भरती केली जात आहे, जाणून घेऊया...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या आस्थापनेवरील गट-अ, गट-ब आणि गट-क अशा वेगवेगळ्या संवर्गातील रिक्त पदे ऑनलाईन नोकरभरतीच्या माध्यमातून भरण्याकरीता जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता आणि इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून 18 फेब्रुवारी 2026 पासून 20 मार्च पर्यंत रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज एमएमआरडीएच्या https://mmrda.maharashtra.gov.in (Division Administration Recruitment) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन (Online) पद्धतीनेच अर्ज सादर करावेत.
advertisement
एमएमआरडीएच्या संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधी माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल.
रिक्त पदे आणि पदं संख्या
गट- अ
  • सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (स्थापत्य)- 07
  • सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (रेलपथ)- 01
  • सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (संकेत आणि दूरसंचार)- 01
  • उपनियोजक- 29
गट- ब
  • सहाय्यक भूमी आणि मिळकत व्यवस्थापक- 04
  • सहाय्यक अभियंता श्रेणी- 2 किंवा सहाय्यक अभियंता (स्थापत्य)- 82
  • सहाय्यक अभियंता श्रेणी- 2 किंवा सहाय्यक अभियंता (रेलपथ)- 04
  • सहाय्यक अभियंता श्रेणी- 2 किंवा सहाय्यक अभियंता (विद्युत)- 16
  • सहाय्यक अभियंता श्रेणी- 2 किंवा सहाय्यक अभियंता (संकेत आणि दुरसंचार)- 02
  • सहाय्यक समाज विकास अधिकारी- 07
  • सहाय्यक विधी अधिकारी- 04
  • उद्यान विद्या सहाय्यक- 02
advertisement
गट-क
  • उप लेखपाल- 33
  • लघुटंकलेखक- 10
  • भूमापक- 31
  • संगणक तंत्रज्ञ- 02
शैक्षणिक पात्रता
अशा एकूण वेगवेगळ्या 235 पदांसाठी भरतीप्रक्रिया केली जात आहे. 10 वी उत्तीर्ण, MS-CIT, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण केलेला असावा, कोणत्याही शाखेतील पदवी, कोणत्याही शाखेत इंजिनियरिंग केलेलं हवं आणि शॉर्टहँड किंवा टायपिंग पूर्ण हवं अशा वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची या भरती प्रक्रियेत आवश्यकता आहे. कोणकोणत्या पदासाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता हवी आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये प्राप्त होईल. 18 ते 38 वयोगटासाठी वयोमर्यादा असून वयामध्ये कोणतीही उमेदवारांना अट मिळणार नाही. बातमीमध्ये नोकरभरतीच्या जाहिरातीची आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक देण्यात येत आहे. त्याचा वापर करून अर्जदार अर्ज करू शकणार आहेत.
advertisement
जर अर्जदाराच्या मनात अर्जाबाबत कोणतीही शंका असेल तर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या 9513165586 या मोबाईल क्रमांकावर रविवार आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी वगळता सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क साधावा. 022-65964000/ 7700/ 7400 या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
MMRDA मध्ये जम्बो भरती; 1,77,500 पर्यंत मिळणार पगार, इथं करा अर्ज!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement