advertisement

Pune Crime : लैंगिक चाचणी, शर्टाचं बटण ते तळहाताऐवढी चिठ्ठी! दत्ता गाडेचा निर्दोष मुक्ततेचा अर्ज, वर्षभरात काय काय घडलं?

Last Updated:

Pune Swarget Bus Depot Case Datta Gade : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढला आणि त्याला शिरूर परिसरातून जेरबंद केलं होतं.

Pune Swarget Bus Depot Case Dattatray Gade
Pune Swarget Bus Depot Case Dattatray Gade
Pune Crime News : फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून टाकणाऱ्या स्वारगेट अत्याचार प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या घटनेला आज वर्ष पूर्ण झालं तरी आरोपी दत्ता गाडे याच्यावरचे आरोप निश्चित झाले नसल्याने संतापाचं वातावरण आहे. अशातच आता दत्ता गाडे याने जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च अर्ज दाखल केला असून पुणे सत्र न्यायलयात यावर सुनावणी होणार आहे. पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. आता दत्ता गाडेच्या अर्जावर कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वर्षभरात काय काय घडलं?

वर्षाभरापूर्वी याच दिवशी स्वारगेट आगारातील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये शिरून एका तरुणीवर दोन वेळा बलात्कार केला होता. ही संतापजनक घटना पहाटे 5:45 ते 6:45 च्या दरम्यान घडली होती. गुन्हा केल्यानंतर आरोपी गाडे हा पसार झाला होता आणि आपल्या गावातील शेतात लपून बसला होता. पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढला आणि त्याला शिरूर परिसरातून जेरबंद केलं होतं. त्यानंतर त्याच्यावर खटला चालू आहे.
advertisement

गाडेविरोधात 892 पानांचे आरोपपत्र

गुन्हा घडल्यानंतर फक्त 52 दिवसांच्या आत पोलिसांनी गाडेविरोधात 892 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. त्यात 82 साक्षीदारांकडे तपास करून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदविले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासात दम असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता दत्ता गाडेला सुट्टी नाहीच, असंच चित्र पहायला मिळत आहे. गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही याचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात आला होता.
advertisement

दत्ता गाडेची लैंगिक क्षमता चाचणी

दरम्यान, गुन्हा घडल्यानंतर जवळपास 48 तासांनंतर पोलिसांनी त्याला गुणाट गावातूनच अटक केली. तब्बल दीड ते दोन दिवस दत्ता ऊसाच्या शेतात लपून बसला होता. त्याच्या शोधासाठी त्तबल 100 पोलीस गुणाट गावात दाखल झाले होते. गुरुवारी मध्यरात्री त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची लैंगिक क्षमता चाचणी ससून रुग्णालयात केली. दत्ताच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला होता. घटनास्थळावर दत्ता गाडेचे केस व शर्टाचे बटण सापडले होते. तर एक तळहाताऐवढी चिठ्ठी देखील सापडली होती, ही चिठ्ठी म्हणजे तरुणीने काढलेलं बसचं तिकीट... तसेच स्वारगेट एसटी स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी गाडे घटनास्थळी हजर असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : लैंगिक चाचणी, शर्टाचं बटण ते तळहाताऐवढी चिठ्ठी! दत्ता गाडेचा निर्दोष मुक्ततेचा अर्ज, वर्षभरात काय काय घडलं?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement