पाण्याअभावी गाव सोडून जाण्याची वेळ, पुण्यातील या गावांवर जलसंकट, Video

Last Updated:

गेल्या 3-4 वर्षात चांगला पाऊस न झाल्याने पुरंदर आणि बारामतीचे जीवनवाहिनी मानले जाणारे नाझरे धरण कोरडे पडले आहे.

+
पाण्याअभावी

पाण्याअभावी गाव सोडून जाण्याची वेळ, पुण्यातील या गावांवर जलसंकट, Video

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढली असतानाच अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. यात पुणे जिल्ह्यातील तालुक्यांचाही समावेश आहे. गेल्या 3-4 वर्षात चांगला पाऊस न झाल्याने पुरंदर आणि बारामतीचे जीवनवाहिनी मानले जाणारे नाझरे धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून परिसरातील गावच्या लोकांवर गाव सोडण्याची वेळ आलीये.
advertisement
नाझरे धरण पडले कोरडे
बारामती, पुरंदर तालुक्यासाठी वरदान असलेल्या नाझरे धरणांची क्षमता 0.59 टीएमसी आहे. यंदा पावसाळ्यात या धरणक्षेत्र परिसरात अवघा 334 मिलिमीटर एवढाच पाऊस पडला. त्यामुळे धरणांत पुरेसा पाणीसाठा झालेला नव्हता. गेल्या वर्षी याच काळात या धरणांत 0.32 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची फारशी अडचण भासली नाही. परंतु चालू वर्षी कमी पावसामुळे धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांवर पाण्याअभावी गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे.
advertisement
पुरंदर तालुक्यात 65 टँकर सुरू
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सध्या सर्वाधिक 65 टँकर सुरू आहेत. नाझरे धरणावर जेजुरी नगरपालिका तसेच त्याच्या अवतीभोवतीची काही गावे आणि वाड्या वस्त्यांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. कोळविहिरे परिसरातील राख, नावळी, कर्नलवाडी, बेलसर, आडाचीवाडी, साकुर्डे, शिवरी, खळद, खानवडी, मावडी, पिंपरी, राजुरी, अशा सुमारे 117 गावांसह 762 वाड्या वस्त्यांवर 65 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
advertisement
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यातील 22 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. धरणात गेल्या वर्षी झालेल्या अपुर्‍या पावसामुळे पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे सद्य:स्थितीला धरण कोरडे पडू लागले आहे. पिण्यासाठी नागरिकांसह जनावरांनाही पाणी मिळेनासे झाले आहे. तर दुसरीकडे शेतपिकेही करपून गेली आहेत. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने आम्ही जगायचं कसं असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होतोय.
मराठी बातम्या/पुणे/
पाण्याअभावी गाव सोडून जाण्याची वेळ, पुण्यातील या गावांवर जलसंकट, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement