मोठी बातमी! पुणे ते कोल्हापूर रेल्वेसेवा ठप्प! 8 गाड्या रद्द, 3 ट्रेनचे मार्ग बदलले, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Kolhapur Railway: कोल्हापूर ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज या मार्गावरील रेल्वेसेवा बंद राहणार आहे.
पुणे: कोल्हापूर ते पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आज, 6 नोव्हेंबरला कोरेगाव, रहिमतपूर आणि तारगाव स्थानकांवर इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. या कामामुळे तब्बल 12 तास रेल्वे वाहतूक ठप्प राहणार आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वेळापत्रक पाहणे गरजेचे आहे.
पुणे-कोल्हापूर मार्गावरील अनेक गाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार आहे. काही गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट व शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येणार आहेत.
या गाड्या रद्द
पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस (01023)
कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेस (01024)
advertisement
कोल्हापूर-सातारा पॅसेंजर (71424)
सातारा-कोल्हापूर पॅसेंजर (71423)
कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (11030)
मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (11029)
मिरज-कोल्हापूर पॅसेंजर (71425)
कोल्हापूर-मिरज पॅसेंजर (71426)
या गाड्या कुर्डुवाडी मार्गे धावणार
यशवंतपूर-चंदीगड एक्स्प्रेस (22685)
निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस (12630)
बंगळूर-जोधपूर एक्स्प्रेस (16508)
काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट
काही गाड्या मध्यवर्ती स्थानकांवरच थांबवल्या जातील. यामध्ये, कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस फक्त किर्लोस्करवाडीपर्यंत धावेल, तर कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस कराडपर्यंत मर्यादित राहील. गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस पुणे येथेच थांबवली जाईल. या काळात पुणे, कोल्हापूर, सातारा, कराड आणि मिरज मार्गांवरील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.
advertisement
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांची अद्ययावत स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, या इंटरलॉकिंग कामानंतर मार्गिकेवरील सिग्नल प्रणाली सुधारली जाईल, ज्यामुळे भविष्यात गाड्यांची वेळ अधिक अचूक राहील.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 06, 2025 8:57 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मोठी बातमी! पुणे ते कोल्हापूर रेल्वेसेवा ठप्प! 8 गाड्या रद्द, 3 ट्रेनचे मार्ग बदलले, कारण काय?


