Pune Traffic : अनंत चतुदर्शीला पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल, 17 रस्ते राहणार बंद,वाचा संपूर्ण यादी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुण्याच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.त्यामुळे अनंत चतुदर्शीच्या दिवशी कोणते रस्ते सूरू राहणार आहेत आणि कोणत्या रस्त्यावरून वाहतून वळवण्यात येणार आहे. हे जाणून घेऊयात.
Pune Traffic Rules Anant Chaturdashi : अभिजीत पोटे, पुणे : शनिवारी 6 सप्टेंबरला 11 दिवसाच्या म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे.या दिवशी गणेश मंडळांची आणि वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमात बदल करण्यात येतात. त्यानुसार आता पुण्याच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.त्यामुळे अनंत चतुदर्शीच्या दिवशी कोणते रस्ते सूरू राहणार आहेत आणि कोणत्या रस्त्यावरून वाहतून वळवण्यात येणार आहे. हे जाणून घेऊयात.
पुणे पोलिसांनी अनंत चतुदर्शीसाठी तगड नियोजन केले आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रॅफिक सह पार्किंग साठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. विशेष म्हणजे पुणेकरांना वाहतुकीची माहिती देण्यासाठी पुणे पोलिसांकडून नवा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पुणेकरांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे.
वाहतुकीत काय बदल असणार ?
advertisement
अनंत चतुदर्शीच्या दिवशी पुणे शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतूकीसाठी बंद असणार आहेत. तर 10 मुख्य रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात येणार आहेत. यासह शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग झोन उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शहरात दोन दिवस जड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी असणार आहे.
पुणे शहरात विसर्जनादरम्यान मोठी गर्दी जमते,यामुळे वाहतूकही खोळंबते. अशा परिस्थितीत शहरात वाहतूक सुरळीत राहावी आणि गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून पुणे पोलिसांनी दोन दिवस वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
advertisement
वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते
शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड,
गणेश रोड ,केळकर रोड, टिळक रोड, जंगली महाराज
रस्ता, कर्वे रोड,FC रोड, भांडारकर रस्ता पुणे सातारा रोड, प्रभात रोड
view commentsवरील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी अनंत चतुदर्शीच्या दिवशी याच नियमांप्रमाणे प्रवास करावा,असे आवाहन करण्यात येत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 04, 2025 5:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic : अनंत चतुदर्शीला पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल, 17 रस्ते राहणार बंद,वाचा संपूर्ण यादी

