Pune News : पुण्यात कडाक्याची थंडी, पण शेकोटीला बंदी; महापालिकेनं सांगितलं कारण

Last Updated:

PMC Orders Ban on Open Bonfires in Pune : पुणे शहरातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जिथे जर कोणत्या नागरिकांनी शेकोटी पेटवली तर त्यांना ते महागात पडणार आहे. नेमकी कोणती कारवाई करण्यात येईल ते एकदा जाणून घ्या.

News18
News18
पुणे : महाराष्ट्रात सध्या थंडीचे दिवस सुरु झाले असून सर्वत्र हुडहुडी भरलेली आहे. थंडी असल्याने शहरात अनेकजण रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवता. मात्र आता पुणेकरांना कितीही थंडी वाजली तरी शेकोटो पेटवता येणार नाही. जर कोणही शेकोटी पेटवताना दिसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.
असा निर्णय का घेतला?
थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण शेकोट्या पेटवतात. या शेकोट्या पेटवण्यासाठी लोक लाकूड, कोळसा, कचरा किंवा इतर ज्वलनशील साहित्याचा उपयोग करतात. मात्र, अशा शेकोट्यांमुळे फक्त थंडीपासून आराम मिळत नाही, तर शहरातील वातावरणावर गंभीर परिणाम होतो.
उघड्यावर पेटवलेल्या शेकोट्यांमुळे निर्माण होणारा धूर आणि धूळ शहरातील हवा प्रदूषण वाढवते. यामुळे प्रत्येकाला श्वसनसंस्थेशी संबंधित समस्या, सर्दी-खोकला, अस्थमा आणि इतर श्वसनविकार होण्याची शक्यता वाढते. इतकेच नव्हे तर अशा आगीतून मोठ्या दुर्घटनेचा धोका सुद्धा संभवतो. लाकूड किंवा कचऱ्यापासून निर्माण होणारी आग अचानक नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, ज्यामुळे इमारती, वाहनं आणि नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
या गंभीर परिस्थितीला लक्षात घेता पुणे महापालिकेने उघड्यावर शेकोट्या पेटवण्याविरोधात कठोर धोरण जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट सांगितले की, थंडीपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, पण त्यासाठी कोणताही प्रकारचा पर्यावरणीय किंवा अग्निसंरक्षण नियम मोडता येणार नाही. उघड्यावर शेकोट्या पेटवून प्रदूषण निर्माण करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. यामध्ये संबंधित परिसरातील नागरिक, व्यावसायिक संस्था आणि गृहनिर्माण संस्थांवर कडक कार्यवाही केली जाईल.
advertisement
महापालिकेने नागरिकांना पर्यावरणपूरक आणि सुरक्षित उपाय अवलंबण्याचे आवाहन केले आहे. थंडीपासून संरक्षणासाठी इलेक्ट्रिक हीटर, सेंटरल हीटिंग किंवा इतर सुरक्षित पर्याय वापरण्याचे सल्ला देण्यात आला आहे. पुणेकरांनी सुरक्षिततेकडे लक्ष ठेवून शेकोट्या टाळणे आवश्यक आहे, अन्यथा महापालिकेकडून ठोस कारवाई होईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुण्यात कडाक्याची थंडी, पण शेकोटीला बंदी; महापालिकेनं सांगितलं कारण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement