पुण्यात मांजराच्या 'घाणी'वरून शेजाऱ्यांमध्ये जुंपली! 3 महिलांमध्ये तुफान हाणामारी; थेट पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दारात मांजराने केलेल्या घाणीवरून सुरू झालेला वाद चक्क लाथाबुक्क्यांपर्यंत पोहोचला. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यात गेलं आहे.
पुणे: शहरात पक्षी आणि मांजरामुळे झालेला वाद पोलिसांपर्यंत पोहोचल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता येरवड्यात एक अजब आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. यात दारात मांजराने केलेल्या घाणीवरून सुरू झालेला वाद चक्क लाथाबुक्क्यांपर्यंत पोहोचला. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यात गेलं आहे.
नेमका काय आहे वाद?
ही घटना १८ मार्च २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास येरवड्यातील यशवंतनगर परिसरात घडली. येथील रहिवासी कोमल शिरसागर (वय २९) यांच्या घराच्या दरवाजासमोर शेजारी राहणाऱ्या मुन्नी शेख आणि सिबा शेख यांच्या पाळीव मांजराने घाण केली होती. कोमल यांनी शेजाऱ्यांना सांगितलं की "तुमच्या मांजराने घाण केली आहे, ती साफ करा." मात्र, "ते मांजर आमचं नाहीच," असं उत्तर मिळाल्यानं वादाची ठिणगी पडली.
advertisement
साध्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद काही क्षणांतच इतका विकोपाला गेला की, दोन्ही बाजूंनी शिवीगाळ सुरू झाली. आरोपानुसार, मुन्नी शेख आणि सिबा शेख यांनी कोमल शिरसागर यांना भररस्त्यात हाताने बेदम मारहाण केली. या भांडणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
जखमी झालेल्या कोमल यांनी थेट येरवडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी मुन्नी आणि सिबा शेख यांच्याविरुद्ध अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल केला आहे. "मांजराची घाण कोण साफ करणार?" या एका साध्या प्रश्नावरून दोन कुटुंब कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने येरवड्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 2:36 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात मांजराच्या 'घाणी'वरून शेजाऱ्यांमध्ये जुंपली! 3 महिलांमध्ये तुफान हाणामारी; थेट पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण










