तब्बल 18 वर्षांनी दुर्मिळ योगायोग, भारतात दिसणार शनी चंद्रग्रहण; जाणून घ्या, कधी आणि कुठे पाहू शकाल?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, या काळात शनी चंद्राच्या मागे लपणार आहे आणि चंद्राच्या कडेवरून शनीचं एक वलय तयार होणार आहे. या अद्भूत योगाचं संशोधन खगोलशास्त्रात संशोधन करत आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : आकाशात दिसणारा चंद्र आपल्या कक्षेत शनीला पूर्णपणे झाकून ठेवणार आहे. तब्बल 18 वर्षांनतर भारतात हा दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये शनीला कर्मफळदाता ग्रह म्हटलं जातं. कारण शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यानुसार, आकाशात दिसणारा चंद्र आपल्या कक्षेत शनीला पूर्णपणे झाकून ठेवणार आहे. तब्बल 18 वर्षांनतर भारतात हा दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. भारतात 24-25 जुलैच्या मध्यरात्री हे चंद्रग्रहण दिसणार आहे. याबाबत ज्योतिषी राजेश जोशी यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, या काळात शनी चंद्राच्या मागे लपणार आहे आणि चंद्राच्या कडेवरून शनीचं एक वलय तयार होणार आहे. या अद्भूत योगाचं संशोधन खगोलशास्त्रात संशोधन करत आहेत.
ही असणार शनी चंद्रग्रहणाची वेळ -
खगोलशास्त्राच्या अंदाजानुसार, 24 जुलै रोजी रात्री 01.30 वाजता आकाशात हे दृश्य पाहायला मिळणार आहे. रात्री 1 वाजून 44 मिनिटांनी चंद्र शनीला आपल्या मागे पूर्णपणे झाकणार असल्याची माहिती आहे. तर, रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी शनी ग्रह चंद्राच्या कक्षेतून बाहेर निघताना दिसेल, असा अंदाज लावण्यात येतोय.
advertisement
या देशांत दिसणार शनी चंद्रग्रहण -
advertisement
हे अद्भूत शनी चंद्रग्रहण भारतात तर दिसणारच आहे. पण, भारता व्यतिरिक्त श्रीलंका, म्यानमार, चीन आणि जपानमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. शनीच्या चंद्रग्रहणाच्या या घटनेला 'लूनार ऑकल्टेशन ऑफ सॅटर्न' असं नाव देण्यात आलं आहे. आपल्या गतीने चाललेले दोन ग्रह जेव्हा आपला मार्ग बदलतात तेव्हा शनी ग्रह चंद्राच्या मागून उगवतो. यामध्ये सर्वात आधी शनीचे वलय स्पष्ट दिसतात. हा अद्भूत योग खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी फार उत्सुकतेचा विषय आहे.
advertisement
3 महिन्यांनंतर पुन्हा दिसणार हे दृश्य -
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, शनी चंद्रग्रहणाचं हे दृश्य फक्त दुर्बिणीने दिसू शकते. तसेच, 3 महिन्यांनंतर हे दृश्य पुन्हा भारतात दिसणार आहे. तसेच खगोलशास्त्राच्या अंदाजानुसार, जर जुलै महिन्यात हे चंद्रग्रहण दिसलं नाही तर 14 ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली आहे.
advertisement
सूचना - ही माहिती ज्योतिषांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 23, 2024 3:21 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
तब्बल 18 वर्षांनी दुर्मिळ योगायोग, भारतात दिसणार शनी चंद्रग्रहण; जाणून घ्या, कधी आणि कुठे पाहू शकाल?