पुण्यातलं असं मार्केट, जिथं फक्त 10 रुपयांपासून मिळतात विविध वस्तू, खरेदीसाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील हिंजवडी वाकड जवळ हे फ्ली मार्केट असून गेली 1 वर्ष झालं सुरु आहे आणि इथे असंख्य प्रकारच्या वस्तू या पाहिला मिळतात. 10 रुपये पासून ते अगदी 1200 रुपये पर्यंत वस्तू आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : शॉपिंग हा तसा महिलांच्या आणि मुलींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मुलींचा मूड चांगला असो किंवा नसो पण मुलींना शॉपिंग केल्यानंतर आनंद मिळतो. पुणे शहरातही शॉपिंगसाठी अनेक प्रसिद्ध असे मार्केटस आणि वेगवेगळी ठिकाणे आहेत. यातच एक म्हणजे हिंजवडी जवळ असलेल्या फ्ली मार्केट.
या मार्केटमध्येही विविध प्रकारची ज्वेलरी, कपडे, विविध वस्तू याठिकाणी पाहायला मिळतात. त्यांची किंमत जर पाहिली तर 10 रुपयांपासून या वस्तू सुरू होतात. त्यामुळे याठिकाणी नेमक्या कोणकोणत्या वस्तू मिळतात, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
100 वर्षे जुनी सरकारी शाळा, पण महत्त्वाच्या विषयांना शिक्षक नाही, 1992 पासून मुख्याध्यापक पदही रिक्त; धाराशिवमधील धक्कादायक वास्तव
पुण्यातील हिंजवडी वाकडजवळ हे फ्ली मार्केट आहे. मागील वर्षभरापासून हे मार्केट सुरू झाले. येथे अनेक प्रकारच्या वस्तू या पाहायला मिळतात. 10 रुपयांपासून ते अगदी 1200 रुपयांपर्यंत वस्तू आहेत. त्यांची क्वालिटी ही अतिशय चांगली असल्यामुळे लोकांची गर्दीही इथे होत असते. तसेच एकाच ठिकाणी इतक्या वस्तू मिळत असल्याने नागरिकांना कुठंही जायची गरज नाही. कपड्यांसोबत वस्तूदेखील इथे मिळतात.
advertisement
आई करायची धुणीभांडी, तर वडील होते कॅन्टीनमध्ये; पण मुलानं करुन दाखवलं, चेंबूरमधील हॉटेलची सर्वत्र चर्चा
ज्वेलरी, कॉस्मेटिक, टी शर्ट, जिन्स,कुर्ती, हे वेगवेगळ्या साईझमध्ये आहेत. तर अगदी छोट्या क्लिप, कानातले, टॉप कुर्ती, ड्रेस मटेरिअल, जीन्स जॅकेटचे व्हरायटीसुद्धा इथे उपलब्ध आहे. या वस्तू रोजच्या वापरासाठी किंवा कुठे बाहेर जाण्यासाठीही वापरू शकता. त्यामुळेच तुम्हाला अशा अगदी स्वस्तात वस्तू खरेदी करायचं तर इथे नक्कीच येऊ शकतात, अशी माहिती व्यावसायिक राकेश तारू यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 23, 2024 2:14 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातलं असं मार्केट, जिथं फक्त 10 रुपयांपासून मिळतात विविध वस्तू, खरेदीसाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद