SSC/HSC Result 2024 : 10 वी, 12 वी चा निकाल कधी लागणार? बोर्डाकडून महत्त्वाची माहिती समोर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी : दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांच्या आयुष्यातील देखील महत्त्वाचा टप्पा असतो. या दोन परीक्षानंतरच सामान्यपणे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते. दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.
दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. इयत्ता बारावीचा निकाल हा मेच्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल हा चौथ्या आठवड्यात लागेल अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच विद्यार्थ्यांची निकालाबाबतची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे.
दरम्यान दहावी बारावीचा निकाल लागल्यानंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. आपल्या पंसतीचं महाविद्यालय मिळावं यासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. याच महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
May 17, 2024 12:11 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
SSC/HSC Result 2024 : 10 वी, 12 वी चा निकाल कधी लागणार? बोर्डाकडून महत्त्वाची माहिती समोर


