एक कॉल अन् पुण्यातील वृद्धाने स्वतःच चोरट्यांना पाठवले 34 लाख रूपये, मग पोलिसात धाव, प्रकरण काय?

Last Updated:

'डिजिटल अरेस्ट'चा वापर करून एका ७३ वर्षीय वृद्धाला तब्बल ३४ लाख ८० हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील वृद्धाची फसवणूक (AI Image)
पुण्यातील वृद्धाची फसवणूक (AI Image)
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील तळेगाव दाभाडे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यात 'डिजिटल अरेस्ट'चा वापर करून एका ७३ वर्षीय वृद्धाला तब्बल ३४ लाख ८० हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून वृद्धाच्या मनात अटकेची भीती निर्माण केली आणि ही फसवणूक केली.
दिवाकर पांडुरंग पंचवाडकर (७३) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २७ नोव्हेंबर ते २९ डिसेंबर २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. संशयित आरोपींनी फिर्यादीला व्हॉट्सॲपवर फोन करून आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. "तुमच्या नावावर एका मोठ्या फ्रॉड केसमध्ये गुन्हा दाखल झाला असून तुम्हाला लवकरच अटक केली जाईल," अशी भीती त्यांनी घातली. विश्वास बसावा यासाठी त्यांनी काही बनावट कागदपत्रेही पाठवली.
advertisement
तपासातून सुटका हवी असल्यास पैसे द्यावे लागतील, असे सांगून आरोपींनी वृद्धाला 'डिजिटल अरेस्ट' केलं. घाबरलेल्या पंचवाडकर यांनी आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ३४ लाख ८० हजार २०० रुपये जमा केले.
अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकधारक आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून ही लूट केल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
एक कॉल अन् पुण्यातील वृद्धाने स्वतःच चोरट्यांना पाठवले 34 लाख रूपये, मग पोलिसात धाव, प्रकरण काय?
Next Article
advertisement
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement