पुण्यात भीषण अपघात; विद्यार्थ्यांनी भरलेली भरधाव स्कूल बस झाडावर आदळली, अपघाताचा पहिला Video समोर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पुण्यात स्कूल बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा स्कूल बसमध्ये विद्यार्थी होते. या अपघाताचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे.
पुणे, 5 डिसेंबर, वैभव सोनवणे : पुण्यात स्कूल बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा स्कूल बसमध्ये विद्यार्थी होते. या अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसचा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. मात्र चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून बस झाडावर आदळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघाताचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे.
वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भिषण अपघात झाला आहे. या बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस झाडावर आदळल्याचा अंदाज आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, ही भरधाव स्कूल बस थेट झाडावर येऊन आदळली आहे. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.
advertisement
पुण्यात स्कूल बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा स्कूल बसमध्ये विद्यार्थी होते. या अपघाताचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे. pic.twitter.com/YTzh51ynu0
— News18Lokmat (@News18lokmat) December 5, 2023
दरम्यान या अपघातामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बस वरती आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
December 05, 2023 12:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात भीषण अपघात; विद्यार्थ्यांनी भरलेली भरधाव स्कूल बस झाडावर आदळली, अपघाताचा पहिला Video समोर