Diwali Shopping 2025 : दिवाळीच्या तयारीला लागा! पुण्यातील 'या' 5 बाजारात मिळतील स्वस्त आणि दर्जेदार वस्तू

Last Updated:

Top Diwali Markets Pune : पुण्यातील बाजारपेठा सध्या रंगीबेरंगी दिवे, सजावटीच्या वस्तू आणि नवीन कपड्यांनी उजळल्या आहेत. तुळशीबाग, लक्ष्मी रोड, हाँगकाँग लेन, फॅशन स्ट्रीट आणि जुना बाजार या ठिकाणी स्वस्त दरात आकर्षक वस्तू मिळतात.

News18
News18
पुणे : काय पुणेकरांनो दिवाळी अगदी दारात आली आहे आणि अजूनही विचारात आहात का सणासाठी नवीन कपडे, सजावटीच्या वस्तू, दिवे, मिठाई आणि गिफ्ट्स कुठे खरेदी करायचे आणि तेही स्वस्तात पण दर्जेदार तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पुण्यातील 5 सर्वोत्तम स्ट्रीट शॉपिंग ठिकाणं, जिथं तुम्ही दिवाळीची खरेदी मजेत, स्वस्तात आणि भरपूर पर्यायांसह करू शकता.
दिवाळी शॉपिंगसाठी पुण्यातील टॉप 5 बाजारपेठा, स्वस्त आणि बेस्ट ठिकाणं!
1. तुळशीबाग — पारंपरिक खरेदीसाठी प्रसिद्ध
पुण्यातील सर्वात जुने आणि गजबजलेले मार्केट म्हणजे तुळशीबाग. दिवाळीच्या काळात इथे गर्दीने अक्षरशः उसळते. येथे पारंपरिक कपडे, साड्या, दागिने, दिवे, घर सजावटीच्या वस्तू, कुंभारकाम आणि पूजा साहित्य सर्व काही मिळते. स्वस्तात खरेदी करायची असेल तर हे ठिकाण परफेक्ट आहे. बऱ्याच दुकानांमध्ये भाव करता येतो आणि त्यामुळे कमी किमतीत चांगल्या वस्तू मिळू शकतात.
advertisement
2. फॅशन स्ट्रीट — तरुणांसाठी फॅशनेबल खरेदी
कॅम्प परिसरात असलेली फॅशन स्ट्रीट ही कॉलेज तरुणांची फेव्हरेट शॉपिंग डेस्टिनेशन आहे. येथे तुम्हाला इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारचे कपडे कमी किमतीत मिळतात. दिवाळी पार्टीसाठी ड्रेस, जॅकेट्स, फॅन्सी टॉप्स आणि ॲक्सेसरीज घ्यायच्या असतील तर हे ठिकाण बेस्ट आहे. इथे मिळणारे ट्रेंडी कपडे आणि शूज तुम्हाला आकर्षित करतील.
advertisement
3. जुना बाजार — घर सजावटीच्या वस्तूंसाठी उत्तम ठिकाण
दिवाळीत घर सजवण्यासाठी दिवे, लाइट्स, फुलांच्या माळा आणि शोपीस खरेदी करायचे असतील तर जुना बाजार नक्कीच भेट द्या. येथे तुम्हाला पारंपरिक ते आधुनिक डेकोरेशन मटेरियलपर्यंत सर्व वस्तू मिळतात. घरासाठी सुंदर रंगीत कंदील, तोरणं, आणि दिवे अतिशय वाजवी दरात मिळतात.
4. हाँगकाँग लेन — सर्व काही एका ठिकाणी
डीकॅन कॉलेजजवळ असलेली हाँगकाँग लेन ही शॉपिंगसाठी अजून एक लोकप्रिय जागा आहे. येथे कपडे, फुटवेअर, मोबाइल ॲक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घरगुती वस्तू अतिशय कमी किमतीत मिळतात. इथे भाव करून खरेदी करण्याचा मजा काही वेगळीच! स्वस्त आणि चांगल्या वस्तू मिळतात म्हणून हे ठिकाण विद्यार्थी आणि युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
advertisement
5. लक्ष्मी रोड — दिवाळीची पूर्ण खरेदी एका ठिकाणी
लक्ष्मी रोड हा पुण्यातील सर्वाधिक प्रसिद्ध शॉपिंग रस्ता आहे. येथे कपडे, ज्वेलरी, फॅन्सी फुटवेअर, मिठाई आणि सणासुदीच्या वस्तू सर्व काही मिळते. दिवाळीत येथे दिव्यांचा आणि सजावटी वस्तूंचा खूप मोठा बाजार भरतो. पारंपरिक खरेदीसाठी हे ठिकाण पुणेकरांची पहिली पसंती आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Diwali Shopping 2025 : दिवाळीच्या तयारीला लागा! पुण्यातील 'या' 5 बाजारात मिळतील स्वस्त आणि दर्जेदार वस्तू
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement