Pune Traffic : पुणेकरांनो लक्ष द्या! पुढील 6 दिवस महत्त्वाचे; शहरातील 'या' भागात असणार वाहतुकीत बदल,पर्यायी मार्ग कोणते?
Last Updated:
Pune Traffic Update : कार्तिकी वारीनिमित्त आळंदी परिसरात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी विश्रांतवाडी–आळंदी आणि नगर रस्ता भागात वाहतूक बदल केले आहेत. जड वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आले असून हे बदल 21 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील.
पुणे : कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आळंदी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात वारकरी येणार आहेत. त्यामुळे वाढणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी विश्रांतवाडी ते आळंदी रस्ता तसेच नगर रस्ता परिसरात तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत. हे सर्व बदल 21 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.
पुणे वाहतूक विभागाचा मोठा निर्णय
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले की, आषाढी वारीनंतर कार्तिकी वारीलाही आळंदी येथे हजारो वारकरी दर्शनासाठी येतात. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी होते आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाढते. या परिस्थितीचा विचार करून येरवडा आणि वाघोली वाहतूक विभागांनी विविध मार्गांवर वाहतूक बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
कोणत्या मार्गाचा वापर करावा?
विशेषतहा विश्रांतवाडीहून बोपखेल फाट्याद्वारे आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावरून ट्रक, कंटेनर आणि इतर जड वाहने हलू शकणार नाहीत. अशा वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विश्रांतवाडीतून आळंदीकडे जाणाऱ्या जड वाहनांनी येरवडा, खडकी येथील होळकर पुलावरून पुढे जुन्या मुंबई–पुणे रस्त्याचा वापर करावा.
advertisement
याचबरोबर नगर रस्त्यावर तुळापूर फाटा मार्गे आळंदी–मरकळकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही दुसऱ्या मार्गाने वळवले जाणार आहे. या वाहनांनी शिक्रापूरमार्गे चाकणकडे जावे आणि तेथून पुढे आपल्या ठिकाणी पोहोचावे. यामुळे आळंदीच्या मुख्य मार्गावरून होणारी गर्दी कमी होईल आणि वारकऱ्यांना सुरक्षित आणि सुरळीतपणे दर्शनाला जाता येईल.
वारकरी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हे बदल केले असून सर्व वाहनचालकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 8:17 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic : पुणेकरांनो लक्ष द्या! पुढील 6 दिवस महत्त्वाचे; शहरातील 'या' भागात असणार वाहतुकीत बदल,पर्यायी मार्ग कोणते?


