तुम्हाला अजूनही अतिवृष्टीची मदत मिळाली नाही का? हे काम करताच पैसे होतील जमा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी अनुदान अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. अशा सर्व शेतकरी बांधवांना शासनाने महत्त्वाचे आवाहन केले आहे.
मुंबई : सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी अनुदान अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. अशा सर्व शेतकरी बांधवांना शासनाने महत्त्वाचे आवाहन केले आहे. आपली अनुदान स्थिती त्वरित तपासून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पेमेंट नामंजूर, नावातील तफावत, पेमेंट यशस्वी असूनही रक्कम न येणे, किंवा ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे अनुदान थांबले आहे.
अनुदानाची स्थिती आणि त्याचा अर्थ
शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरील अनुदान स्थितीनुसार पुढीलप्रमाणे उपाय करण्याचा सल्ला देण्यात आला आहे
1) Payment Rejected (पेमेंट नामंजूर)
पेमेंट नामंजूर होण्याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत. जसे की,
आधार सीडिंग पूर्ण नसणे
बँकेत आधार मॅपिंग न होणे
ई-केवायसी अपूर्ण असणे
पर्याय काय?
संबंधित शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या बँकेत जाऊन Aadhaar Seeding, Aadhaar Mapping आणि E-KYC पूर्ण करावे. प्रक्रिया पूर्ण होताच पेमेंट पुन्हा सुरू होऊ शकते.
advertisement
नावातील तफावत
काही प्रकरणांमध्ये Farmer ID वरील नाव आणि आधार कार्डावरील नाव जुळत नाही. या तफावतीमुळे अनुदान रोखले जाते.
पर्याय काय?
शेतकऱ्यांनी आधारकार्ड व Farmer ID यांच्या छायांकित प्रती संबंधित पालक अधिकारी किंवा तलाठी कार्यालयात जमा कराव्यात. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अनुदान प्रक्रिया पुढे सरकेल.
Payment Success – Amount Not Credited
काही वेळा प्रणालीमध्ये पेमेंट यशस्वी दिसत असले तरी रक्कम खात्यावर जमा होत नाही. अशा स्थितीत बँकस्तरावर पडताळणीची आवश्यकता असते.
advertisement
पर्याय काय?
आपल्या बँकेत जाऊन मिनी-स्टेटमेंट किंवा पासबुक एंट्री करून रक्कम न येण्याचे कारण जाणून घ्यावे. आवश्यक असल्यास बँकेमार्फत NPCI तक्रार नोंदवता येते.
ई-केवायसी प्रलंबित
अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसल्याने अनुदान रोखले गेले आहे.
पर्याय काय?
CSC केंद्र किंवा स्वतःच्या मोबाइलद्वारे त्वरित ई-केवायसी पूर्ण करावी.
सामायिक खातेदारांबाबत विशेष सूचना
राज्यात अनेक शेतजमिनी सामायिक मालकीच्या असल्याने, अनुदान वितरणात विलंब होतो. अशा सर्व बाधित शेतकऱ्यांनी संबंधित पालक अधिकाऱ्यांकडे संमतीपत्र (Consent Letter) जमा करणे अनिवार्य आहे. यामुळे सामायिक मालकीच्या खात्यांमधील अडथळे दूर होऊन अनुदान योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल.
advertisement
शेतकऱ्यांनी काय करावे?
view commentsआपल्या अनुदान स्थितीची त्वरित पडताळणी करा. नाव, आधार, Farmer ID, बँक तपशील यामध्ये तफावत असल्यास दुरुस्ती करा. Aadhaar Seeding, Mapping आणि E-KYC पूर्ण करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 8:31 AM IST


