advertisement

Weather Alert : राज्यावर पुन्हा उष्णतेची लाट, या जिल्ह्यांना येलो अलर्ट, पाहा हवामान अंदाज

Last Updated:

राज्यात सध्या उष्णतेचा कहर सुरू आहे. विविध ठिकाणी तापमानात वाढ होऊन उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागतं आहे. गेल्या काही दिवसांत विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 3 दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

+
News18

News18

पुणे : राज्यात सध्या उष्णतेचा कहर सुरू आहे. विविध ठिकाणी तापमानात वाढ होऊन उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांत विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 3 दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
जळगाव, अहिल्यानागर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला या जिल्ह्यांत 24 एप्रिलसाठी हीट वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अकोला वगळता सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
24 एप्रिलला मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असू शकते. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा त्रास नागरिकांना जास्त होऊ शकतो. पुण्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 24 एप्रिलला त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. 24 एप्रिलला नाशिकमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते.
advertisement
नागपूरमधील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 24 एप्रिलला हीट वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील तापमानात वाढ बघायला मिळत आहे. सद्यस्थितीत राज्यातील तापमान 34 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झाल्याचे देखील दिसून येत आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट असल्याचे देखील बघायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Weather Alert : राज्यावर पुन्हा उष्णतेची लाट, या जिल्ह्यांना येलो अलर्ट, पाहा हवामान अंदाज
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement