पुण्यात गारठा कायम, सांगलीत ढगाळ वातावरण, पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अपडेट

Last Updated:

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. किमान तापमानात वाढ झाली असली तरीही काही भागांत गारवा जाणवत असल्याचे दिसून येत आहे.

News18
News18
पुणे : गेले काही दिवस राज्यात थंडीचा जोर वाढलेला दिसून येत होता. त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. सध्या राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. मात्र, गारवा अजूनही कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यातील किमान तापमानात देखील वाढ झाली आहे. तरीही सकाळी आणि रात्रीच्या वेळी गारवा कायम असल्याचे दिसून येत आहे.
13 जानेवारीला पुणे येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
साताऱ्यामध्ये 13 जानेवारीला कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यात दुपारी किंवा सायंकाळी अंशतः ढगाळ आकाश राहणार आहे. पुढील काही दिवस साताऱ्यातील किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे.
advertisement
सांगलीमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुपारी किंवा सायंकाळी ढगाळ आकाश असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
सोलापूरमध्ये 13 जानेवारीला अंशतः ढगाळ आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत सोलापूर मधील किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
कोल्हापूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये दुपारी किंवा सायंकाळी अंशतः ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. किमान तापमानात वाढ झाली असली तरीही काही भागांत गारवा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण कायम असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात गारठा कायम, सांगलीत ढगाळ वातावरण, पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अपडेट
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement