पश्चिम महाराष्ट्रात वारं बदललं! थंडीचा जोर कमी, पाहा हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
15 जानेवारीला पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये काही ठिकाणी ढगाळ आकाश तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर कमी झालेला दिसून येत आहे.
पुणे : राज्यात सध्या विचित्र स्थिती बघायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी दमट वातावरण असल्याचे दिसून येत आहे. 15 जानेवारीला पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये काही ठिकाणी ढगाळ आकाश तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर कमी झालेला दिसून येत आहे.
15 जानेवारीला पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर ढगाळ आकाश असणार आहे. तर हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यामध्ये 15 जानेवारीला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत साताऱ्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
सांगलीमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगली मध्ये 15 जानेवारीला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. सांगलीमधील किमान तापमानात देखील पुढील काही दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. सोलापूरमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये 15 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. सोलापूरमधील किमान तापमानात देखील पुढील काही दिवसांत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
कोल्हापूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये 15 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. कोल्हापूरमधील किमान तापमानात देखील पुढील काही दिवसांत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सद्या पश्चिम महाराष्ट्रातील थंडीचा जोर कमी झालेला दिसून येत आहेत. मात्र पुढील काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 15, 2025 7:18 AM IST