सोलापूरचा पारा आणखी वाढला, सांगली, पुण्यात काय स्थिती? पाहा आजचा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
राज्यात सध्या सर्वत्र कोरडे हवामान बघायला मिळत आहे. त्याचबरोबर थंडी गायब होऊन आता उकाडा जाणवण्यास देखील सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल आणि किमान तापमानात गेल्या काही दिवसांत बहुतांश वाढ झालेली दिसून येत आहे.
पुणे : राज्यात सध्या सर्वत्र कोरडे हवामान बघायला मिळत आहे. त्याचबरोबर थंडी गायब होऊन आता उकाडा जाणवण्यास देखील सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल आणि किमान तापमानात गेल्या काही दिवसांत बहुतांश वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत सुद्धा आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 9 फेब्रुवारीला पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने पुणेकरांना उकाडा सहन करावा लागत आहे.
9 फेब्रुवारीला साताऱ्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. साताऱ्यातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील कमाल आणि किमान तापमानात पुढील काही दिवसांत आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
सांगलीमध्ये 9 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सांगलीमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगलीमधील कमाल आणि किमान तापमानात बहुतांश वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
सोलापूरमध्ये देखील मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. 9 फेब्रुवारीला सोलापूरमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांच्या तुलनेत सोलापूर मधील कमाल आणि किमान तापमानात सर्वाधिक वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
advertisement
कोल्हापूरमधील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. इतर शहरांप्रमाणे कोल्हापूरमधील कमाल आणि किमान तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमधील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आता नागरिकांना उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या तापमानामुळे मानवी आरोग्याला आणि शेतातील पिकांना काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 09, 2025 7:23 AM IST