Weather Report: महाशिवरात्रीला सूर्यदेवाचं रौद्र रूप, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे चटके, आजचा हवामान अंदाज
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather update: महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्यदेवानं रौद्र रूप घेतल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढणार असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
पुणे: महाशिवरात्रीच्या दिवशी राज्यात विविध शहरांतील तापमानात आणखी वाढ झालेली दिसून येत आहे. मुंबईतील तापमानात बहुतांश वाढ होऊन हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा देण्यात आलाय. मुंबईतील कमाल तापमान 39 अंशापर्यंत पोहचले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात देखील आज आणखी वाढ झालेली दिसून येत आहे. फेब्रुवारीअखेरीस पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच उकाडा आणि उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
पश्चिम महाराष्ट्रात आज कोरडे हवामान राहून काही ठिकाणी निरभ्र आकाश तर काही तर ठिकाणी दुपारनंतर ढगाळ आकाश होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुण्यातील तापमानात अंशतः घट झालेली दिसून येत आहे. आज पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी आज मुख्यतः निरभ्र आकाश राहून दुपार किंवा संध्याकाळच्या वेळी अंशतः ढगाळ आकाश होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
साताऱ्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. आज साताऱ्यात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. साताऱ्यातील तापमानात अंशतः वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत तेथील तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
सांगलीमध्ये आज मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगलीतील कमाल तापमानात अंशतः घट झालेली दिसून येत आहे.
सोलापूरमधील तापमानात वाढ कायम आहे. गेले काही दिवस सोलापुरातील तापमान 38 अंशावर असल्याचे बघायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान हे सोलापूरमध्ये नोंदवल्या गेले होते. आज तेथील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये आज मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे.
advertisement
सोलापूरसह आता कोल्हापूरमधील तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे. कोल्हापूरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी आज मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही शहरांतील तापमानात वाढ झाली आहे तर काही ठिकाणी अंशतः घट झालेली दिसून येत आहे. कोल्हापूर मधील तापमानात वाढ होऊन ते 38 अंशापर्यंत गेले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 26, 2025 7:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Weather Report: महाशिवरात्रीला सूर्यदेवाचं रौद्र रूप, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे चटके, आजचा हवामान अंदाज










