Pune : कोण आहे चैतन्य महाराज वाडेकर? ज्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून झाली अटक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक झाल्यानंतर ते कोण आहेत? आणि त्यांना नक्की का अटक झाली? याची चर्चा लोक करु लागले आहेत. चला त्याच्याबद्दल थोड सविस्तर जाणून घेऊ.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील हभप चैतन्य महाराज वाडेकर यांना पोलिसांकडून रातोरात अटक करण्यात आली, त्यांच्यासोबत त्यांच्या दोन भावांना देखील अचक झाली. ज्यानंतर ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. चैतन्य महाराज वाडेकर हे इंस्टाग्राम आणि युट्यूबवर खूपच ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे त्याच्या फॉलोअर्सची लिस्ट देखील फार मोठी आहे.
चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक झाल्यानंतर ते कोण आहेत? आणि त्यांना नक्की का अटक झाली? याची चर्चा लोक करु लागले आहेत. चला त्याच्याबद्दल थोड सविस्तर जाणून घेऊ.
सोशल मीडियावर प्रसिद्ध प्रसिद्ध असणारे युवा किर्तनकार चैतन्य महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भांबोली गावात झाला. त्यांच्या जन्म 17 ऑक्टोबर 1994 साली झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे झाले असून संत साहित्याचे शिक्षणही त्यांनी येथेच पूर्ण केले. ज्यानंतर त्यांनी 2021 मध्ये लग्न केलं.
advertisement
चैतन्य महाराज हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष आहेत. या संस्थेंच्या माध्यमातून ते वारकरी संत, साहित्याचा प्रचार आणि प्रसार करतात. तसेच, युवा किर्तनकार म्हणून त्यांची समाजात ओळख आहे. युवा वर्गात मोटीव्हेशनल किर्तनकार आणि समाजातील तरुणाईला उपदेश देण्याचं काम ते करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ हे वादाचा विषय देखील ठरले आहेत. पण असं असलं तरी देखील ते आपले उपदेश देणं सुरुच ठेवतात.
advertisement
का झाली चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक?
चैतन्य महाराज म्हाळुंगे परिसरात राहतात. त्यांच्या घराशेजारीच एक कंपनी असून तिथल्या वाटेवरून त्यांच्यात वाद आहेत. बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता चैतन्य महाराज यांनी पोकलेनच्या सहाय्याने खोदल्याचा आरोप आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी चैतन्य महाराजांसह त्यांच्या भावांविरोधात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनंतर तिघांना आधी ताब्यात घेण्यात आलं होतं नंतर अटकही केली.
advertisement
पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सोडून देखील देण्यात आलं, परंतू त्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पोहोचली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 03, 2024 3:24 PM IST








