Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यासाठी आकर्षक नॅनो गुढ्या, खरेदी करा 100 रुपयांपासून, पुण्यातील या ठिकाणाला द्या भेट
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुण्यातील मंडई परिसरात गाठी आणि गुढीच्या साहित्याने बाजारपेठ सजलेली पाहायला मिळत आहे. बाजारात नॅनो गुढी उपलब्ध झाल्या आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : हिंदू नववर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी गुढीपाडवा मोठ्या आनंदात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवाच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पाडव्याच्या दिवशी खास महत्त्व असते ते साखरेच्या गाठीला. पुण्यातील मंडई परिसरात गाठी आणि गुढीच्या साहित्याने बाजारपेठ सजलेली पाहायला मिळत आहे. बाजारात नॅनो गुढी उपलब्ध झाल्या आहेत.
advertisement
पुण्यातील मंडई मार्केट हे सणाच्या काळामध्ये गजबजून गेलेलं पाहायला मिळतं. आता दोन दिवसांवर पाडवा असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दिसत आहे. आकर्षक नॅनो गुढी देखील बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या नॅनो गुढीची किंमत 100 रुपयांपासून 600 रुपयापर्यंत आहेत.
advertisement
महागाईचा फटका या गाठींना नाही बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दर काहीसे वाढलेले आहेत. आकर्षक अशा गाठी देखील बाजारात आहेत. यामध्ये 9 प्रकार असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. गाठी या 100 रुपये किलो प्रमाणे आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहेत.
advertisement
दर हे दरवर्षी वाढत जात आहेत. मागच्या वर्षी 20 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 30 रुपयांना मिळत आहे. दरवर्षी भाव वाढत असून उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने दर वाढले असले तरी देखील ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे, असं ग्राहकांनी सांगितलं.
view comments
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 28, 2025 7:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यासाठी आकर्षक नॅनो गुढ्या, खरेदी करा 100 रुपयांपासून, पुण्यातील या ठिकाणाला द्या भेट










