Guru Pushya Yoga: 5 अद्भुत योगात शाकंभरी पौर्णिमा! देवी लक्ष्मीच्या सदैव कृपेसाठी या गोष्टी आणाव्या घरी, अक्षय संपत्ती

Last Updated:

Guru Pushya Yoga: असे संयोग कित्येक वर्षांनंतर एकत्र तयार होत असल्याचे मानले जाते. या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी योगासोबत गुरुपुष्यामृत योग देखील तयार होत आहे.

News18
News18
मुंबई, 20 जानेवारी : हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षातील आजचा 25 जानेवारी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी शाकंभरी म्हणजेच पौष पौर्णिमेसह अनेक अद्भुत योग तयार होत आहेत. असे संयोग कित्येक वर्षांनंतर एकत्र तयार होत असल्याचे मानले जाते. या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी योगासोबत गुरुपुष्यामृत योग देखील तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि चंद्र देवाची पूजा केल्यानं शुभ फळ प्राप्त होते. शिवाय या दिवशी काही गोष्टी खरेदी केल्यानं व्यक्तीला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही, असे मानले जाते. जाणून घेऊया 25 जानेवारी 2024 रोजी कोणत्या गोष्टी करणं शुभ मानलं जातं.
25 जानेवारीला पौष पौर्णिमा -
प्रत्येक महिन्यात अमावस्येनंतर पौर्णिमा येत असते. पौष महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगास्नानासोबत दान केल्यानं पुण्य प्राप्त होतं.
25 जानेवारी रोजी हे आश्चर्यकारक योग तयार होत आहेत -
हिंदू कॅलेंडरनुसार 25 जानेवारीला पौष पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, रवि, प्रीति योगासह गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग दिवसभर असेल. सकाळी 07.13 ते 08.16 पर्यंत रवि योग आहे. गुरुपुष्य आणि अमृत सिद्धी योग 25 जानेवारी रोजी सकाळी 8:16 ते 26 जानेवारी सकाळी 7:12 पर्यंत आहे.
advertisement
गुरुपुष्यामृत नक्षत्रात या गोष्टी खरेदी करा -
हरभरा डाळ -
25 जानेवारीला गुरुपुष्य योगात हरभरा डाळ खरेदी करू शकता, कारण ती गुरुशी संबंधित आहे. त्यामुळे कुंडलीत बृहस्पतिची स्थिती मजबूत होते, माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहते.
सोने चांदी -
गुरु पुष्य योगात सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या गोष्टी सुख-समृद्धीच्या प्रतीक मानल्या जातात. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सोन्या-चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करू शकता. या दिवशी खरेदी केलेली संपत्ती वाढत जाते, असे मानले जाते.
advertisement
वाहन, मालमत्ता -
25 जानेवारी रोजी तयार होत असलेल्या योगामध्ये वाहन, घर किंवा कोणत्याही प्रकारची महत्त्वाची खरेदी करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
पूजेशी संबंधित गोष्टी -
25 जानेवारी रोजी तुम्ही सिंदूर, अक्षत, धार्मिक पुस्तके, देवी-देवतांची चित्रे इत्यादी पूजेशी संबंधित वस्तू खरेदी करू शकता. याचे शुभ परिणामही तुम्हाला मिळतील.
advertisement
पठण करा -
या अद्भुत योगात तुम्हाला काही खरेदी करणं शक्य नसल्यास देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्री सूक्ताचे पठण करा. असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Guru Pushya Yoga: 5 अद्भुत योगात शाकंभरी पौर्णिमा! देवी लक्ष्मीच्या सदैव कृपेसाठी या गोष्टी आणाव्या घरी, अक्षय संपत्ती
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement