advertisement

पाचूमुळे कोणीच नाही पकडू शकणार तुमचा हात; पण वापरताना केलीत चूक, तर होईल दुर्दशा!

Last Updated:

नवरत्नांपैकी एक रत्न आहे पाचू. जे प्रामुख्याने 5 रंगांमध्ये उपलब्ध असतं. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.

मोती, पोवळे, लसण्या, पुष्कराज, गोमेद, माणिक, हिरा, पाचू (पन्ना) आणि नीलम हे नवरत्न आहेत.
मोती, पोवळे, लसण्या, पुष्कराज, गोमेद, माणिक, हिरा, पाचू (पन्ना) आणि नीलम हे नवरत्न आहेत.
ईशा बिरोरिया, प्रतिनिधी
ऋषिकेश : ज्योतिषशास्त्रात नवरत्न आणि त्यांच्या उपरत्नांना विशेष महत्त्व आहे. व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रह, ताऱ्यांची स्थिती आणि दोष पाहून तिला विशिष्ट रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आयुष्यातील विविध अडचणींपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं, म्हणूनच रत्न प्रचंड महाग असतात. ज्यांना नवरत्न खरेदी करणं शक्य नसेल त्यांना उपरत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
नवरत्नांपैकी एक रत्न आहे पाचू. जे प्रामुख्याने 5 रंगांमध्ये उपलब्ध असतं. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे ते नेमकं कोणी परिधान करावं पाहूया. कारण त्याचे नुकसानही अनेक आहेत. उत्तराखंडच्या ऋषिकेश भागातील जेम्स अँड हँडीक्राफ्ट दुकानाचे मालक अशोक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
अशोक सांगतात, मोती, पोवळे, लसण्या, पुष्कराज, गोमेद, माणिक, हिरा, पाचू (पन्ना) आणि नीलम हे नवरत्न आहेत. करियर, नोकरी, व्यवसायात यश मिळावं यासाठी लोक पाचू परिधान करतात. या रत्नामुळे वाणी शुद्ध आणि प्रभावशाली होते. शिवाय व्यक्तीच्या सर्व इच्छाही पूर्ण होतात.
advertisement
पाचूचे फायदे आणि नुकसान
कुंडलीत बुध ग्रहाचं स्थान भक्कम व्हावं यासाठी पाचू परिधान केलं जातं. त्यामुळे बुध ग्रहाचे सर्व दोष नष्ट होतात. या ग्रहाचा संबंध आई-मुलाचं आणि वडील-मुलाच्या नात्याशी असतो. परिणामी पाचूमुळे ही नातीदेखील भक्कम होतात. शिवाय डोळ्यांसाठीही हे रत्न उत्तम आहे. ज्यांना कमी वयात चष्मा लागतो, त्यांनी पाचू परिधान करावं.
advertisement
परंतु लक्षात घ्या, जर बुध ग्रहाची महादशा सुरू असेल आणि कुंडलीत आठव्या किंवा बाराव्या घरात तो ठाण मांडून बसला असेल, तर मात्र पाचू परिधान केल्यास आपल्याला एकाचवेळी अनेक भयंकर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जोतिषांच्या सल्ल्यानुसारच पाचू परिधान करावं. ते तुम्हाला पाचू परिधान करण्याचा विधीदेखील सांगतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
पाचूमुळे कोणीच नाही पकडू शकणार तुमचा हात; पण वापरताना केलीत चूक, तर होईल दुर्दशा!
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement