Airavateswarar Temple : या मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच ऐकू येतं संगीत, यामागचं नेमकं कारण काय?

Last Updated:

ऐरावतेश्वर मंदिर, कुंभकोणमजवळ, चोल साम्राज्याने बांधलेले, अद्वितीय वास्तुकला, रहस्यमयी पायऱ्या, आणि भव्य रथामुळे प्रसिद्ध आहे. हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. या अद्भूत मंदिराची आणखी वैशिष्ट्ये कोणती ते पाहुया...

Airavateswarar Temple
Airavateswarar Temple
तामिळनाडूतील कुंभकोणमजवळील दारासुरम येथे असलेले ऐरावतेश्वर मंदिर हे भारतीय स्थापत्यकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. हे मंदिर १२ व्या शतकात चोल साम्राज्यातील राजा राजराजा चोल दुसरा यांनी बांधले होते. हे भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिराची खासियत म्हणजे याचे अनोखे स्थापत्यशास्त्र आणि रहस्यमय रचना आहे. भव्य द्रविडीयन शैलीतील वास्तुकला, संगीत निर्माण करणाऱ्या पायऱ्या आणि मोठा दगडी रथ यामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, या मंदिरातील काही रहस्ये वैज्ञानिकांनाही आजवर उलगडता आलेली नाहीत.
भव्य स्थापत्यशैली : या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे द्रविडीयन शैलीतील स्थापत्यकला आहे. मंदिराच्या मुख्य भागात मोठा दगडी रथ असून, तो घोड्यांनी ओढला जात आहे असे भासते. या रथाची रचना अतिशय सुंदर असून, चोल सम्राटांच्या उत्कृष्ट कारागिरीचे दर्शन घडवते. मंदिरातील प्रत्येक खांब आणि कोरीव काम हे चोल काळातील अप्रतिम शिल्पकलेचे उदाहरण आहे.
advertisement
रहस्यमय पायऱ्या : या मंदिरातील सर्वांत अद्भुत बाब म्हणजे येथील संगीत निर्माण करणाऱ्या पायऱ्या. मंदिराच्या एका भागात तीन विशेष पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवर पाय ठेवल्यास किंवा हलकासा धक्का दिल्यास, वेगवेगळ्या रागांचे संगीत निर्माण होते. हे अगदी एखाद्या वाद्यासारखे वाजते. हे रहस्य वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकित करते. अनेक संशोधकांनी याचा अभ्यास केला, पण 800 वर्षांनंतरही या पायऱ्यांचे गूढ कोणी उलगडू शकलेले नाही. या अद्भुत वैशिष्ट्यांमुळे युनेस्कोने 2004 मध्ये या मंदिराचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला. जगभरातील हजारो पर्यटक हे अद्भुत मंदिर पाहण्यासाठी येथे येतात.
advertisement
इतिहास आणि महत्त्व : हे मंदिर राजा राजराजा चोल दुसरे यांनी 12 व्या शतकात बांधले. हे मंदिर भगवान शिवाच्या हत्ती ऐरावत याच्या नावाने ओळखले जाते. पुराणानुसार, ऐरावताने येथे भगवान शिवाची पूजा केली होती. त्यामुळे या मंदिराला ऐरावतेश्वर असे नाव देण्यात आले. भव्य स्थापत्यशैली, रहस्यमय पायऱ्या आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे हे मंदिर पर्यटकांसाठी एक अनोखे ठिकाण आहे. जर तुम्हाला भारतीय स्थापत्यशास्त्र आणि इतिहासाची आवड असेल, तर एकदा तरी या मंदिराला भेट द्यायला हवी.
advertisement
कसे पोहोचाल? : ऐरावतेश्वर मंदिर कुंभकोणमजवळ आहे. येथे रस्त्याने, रेल्वेने किंवा विमानाने पोहोचता येते. ऑक्टोबर ते मार्च हा या मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि मंदिराच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येतो.
advertisement
मराठी बातम्या/अध्यात्म/
Airavateswarar Temple : या मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच ऐकू येतं संगीत, यामागचं नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement