Ashadhi Wari 2025: भेटी लगी जीवा...! माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेला; मुक्काम, रिंगण आणि संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

Ashadhi Wari 2025: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान 19 रोजी आळंदीतून पंढरीकडे झालं. मुक्काम, रिंगण आणि संपूर्ण वेळापत्रक पाहू.

Ashadhi Wari 2025: भेटी लगी जीवा...! माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेला; मुक्काम, रिंगण आणि संपूर्ण वेळापत्रक
Ashadhi Wari 2025: भेटी लगी जीवा...! माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेला; मुक्काम, रिंगण आणि संपूर्ण वेळापत्रक
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज, 19 जून रोजी आळंदीतून सुरुवात झाली. सालाबादप्रमाणे माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने निघाली आहे. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ लागली असून, 6 जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी राज्यभरातील संतांच्या पालखी यात्रा पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या संपूर्ण तयारीबाबत आळंदी देवस्थान कमिटीने माहिती दिली असून, मार्गावरील वाहतूक नियोजन, वैद्यकीय सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि अग्निशमन सेवा याबाबत पूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा वेळापत्रक 2025
19 जून – आळंदी येथून पालखी प्रस्थान
advertisement
20 जून – आळंदी ते पुणे (29 कि.मी)
21 जून – पुणे मुक्काम
22 जून – पुणे ते सासवड (32 कि.मी)
23 जून – सासवड मुक्काम
24 जून – सासवड ते जेजुरी (16 कि.मी)
25 जून – जेजुरी ते वाल्हे (12 कि.मी)
26 जून – वाल्हे ते लोणंद (20 कि.मी) – माऊलींना निरास्नान
advertisement
27 जून – लोणंद ते तरडगाव (8 कि.मी)
28 जून – तरडगाव ते फलटण (21 कि.मी)
29 जून – फलटण ते बरड (18 कि.मी)
30 जून – बरड ते नातेपुते (21 कि.मी) – बरड येथे गोल रिंगण
1 जुलै – नातेपुते ते माळशिरस (18 कि.मी) – सदाशिवनगर येथे गोल रिंगण
advertisement
2 जुलै – माळशिरस ते वेळापूर (19 कि.मी) – खुडूस येथे गोल रिंगण
3 जुलै – वेळापूर ते भंडी शेगाव (21 कि.मी) – ठाकूरबुवा समाधी, बंधू भेट सोहळा
4 जुलै – भंडी शेगाव ते वाखरी (10 कि.मी) – बाजीराव विहीर येथे उभं रिंगण
5 जुलै – वाखरी ते पंढरपूर – वाखरी येथे गोल रिंगण, पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
advertisement
6 जुलै – देवशयनी आषाढी एकादशी
10 जुलै – पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीचा प्रवास
या वारीत लाखो भाविक विठुनामाच्या गजरात सहभागी होत असून, या अध्यात्मिक यात्रेमुळे संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: भेटी लगी जीवा...! माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेला; मुक्काम, रिंगण आणि संपूर्ण वेळापत्रक
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement