लग्नसराई सुरू, पण 2 महिने 'शुभ विवाह' नाहीच! शुक्र हस्तानं वाढवलं टेन्शन, आपत्कालिन मुहूर्त कोणते?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vivah Muhurat: चातुर्मास संपून यंदाची लग्नसराई सुरू झाली आहे. परंतु, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात विवाहाचे पारंपरिक मुहूर्तच नाहीत.
मुंबई : चातुर्मास 2 नोव्हेंबरला संपल्यानंतर यंदा एकूण 49 विवाह मुहूर्त उपलब्ध असले तरी डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन महिन्यांत एकही पारंपरिक मुहूर्त येत नाही. याचे कारण म्हणजे या संपूर्ण काळात असणारा शुक्र हस्त. या विषयावर ज्योतिषी आदित्य जोशी गुरुजी यांनी लोकल18 च्या माध्यमातून सविस्तर माहिती दिलीये.
शास्त्रानुसार लग्नासाठी महत्त्वाचे ग्रह
शास्त्रानुसार लग्नाचे अधिपती असणारे ग्रह म्हणजे गुरु, शुक्र आणि चंद्र हे ग्रह आहेत. यापैकी शुक्र ग्रहावर सर्वाधिक प्रभाव असतो. म्हणूनच शुक्रावर परिणाम करणाऱ्या स्थितींमध्ये लग्नासारख्या मंगलकार्यांना थांबविणे शास्त्रमान्य आहे.
शुक्र हस्त म्हणजे काय?
जोशी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा शुक्र ग्रह सूर्याच्या अत्यंत जवळ जातो आणि सूर्याच्या तेजामुळे दृष्टीआड होतो, त्या अवस्थेला शुक्र हस्त म्हणतात. या काळात शुक्र ग्रहाची शुभशक्ती कमी होते. विवाह, उपनयन यांसारखी कार्ये टाळावीत. नवीन नातेसंबंधांच्या आरंभासाठी हा काळ प्रतिकूल मानला जातो. म्हणूनच शुक्र हस्ताच्या कालावधीत पारंपरिक विवाह मुहूर्त दिले जात नाहीत.
advertisement
या वर्षीचा शुक्र हस्त कालावधी
सुरूवात : 14 डिसेंबर 2025
समाप्त :30 जानेवारी 2026
या काळात अगदी एकही पारंपरिक मुहूर्त नाही. आपत्कालीन परिस्थितीत विवाहासाठी उपलब्ध दिवस जोशी गुरुजी सांगतात की, “शक्य असल्यास शुक्र हस्ताच्या काळात विवाह करणे टाळावे. पण जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर काही विशेष दिवसांमध्ये विवाह करता येऊ शकतो.”
advertisement
आपत्कालीन मुहूर्त खालीलप्रमाणे
15 डिसेंबर, 20 जानेवारी 2026, 23, 24, 25, 26, 28 आणि 29 जानेवारी 2026 या दिवशी आपत्कालीन मुहूर्त आहेत. डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 हे दोन महिने शुक्र हस्तामुळे पूर्णपणे मुहूर्तविरहित राहणार असले तरी अत्यावश्यक प्रसंगी वरील विशेष दिवस विवाहासाठी विचारात घेता येऊ शकतात, असे जोशी गुरुजींचे स्पष्ट मत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 30, 2025 6:47 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
लग्नसराई सुरू, पण 2 महिने 'शुभ विवाह' नाहीच! शुक्र हस्तानं वाढवलं टेन्शन, आपत्कालिन मुहूर्त कोणते?









