advertisement

बजेटमुळे मोठा बदल! ऐन लगीन सराईत सरकारने दिली गुड न्यूज? सोनं आणि चांदीच्या दरात किती घसरण?

Last Updated:

सध्या लग्नसराईचे दिवस जोरात सुरू आहेत आणि अशातच सोन्या-चांदीच्या वाढत्या भावाने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले होते. मात्र, आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने सराफा बाजारात खळबळ उडवून दिली आहे.

News18
News18
Mumbai : सध्या लग्नसराईचे दिवस जोरात सुरू आहेत आणि अशातच सोन्या-चांदीच्या वाढत्या भावाने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले होते. मात्र, आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने सराफा बाजारात खळबळ उडवून दिली आहे. जागतिक घडामोडी आणि बजेटमधील तांत्रिक बदलांमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत 'घसरण' पाहायला मिळाली असून, लग्नासाठी दागिने घडवणाऱ्या कुटुंबांसाठी ही मोठी 'गुड न्यूज' ठरली आहे. फेब्रुवारी महिन्यात अनेक शुभ मुहूर्त असल्याने अनेकांची सोनं चांदी खरेदी करण्याची घाई होती पण दरामुळे अनेकांचं टेन्शन वाढलं होत त्याला आता कुठेतरी थोडा दिलासा मिळाला असल्याचं दिसून येत आहे.
सोन्या-चांदीच्या दरातील मोठी पडझड
गेल्या काही काळापासून गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आज एका झटक्यात खाली आले आहेत. सोन्याच्या दरात 9% ते 20% पर्यंतची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सोने काही दिवसांपूर्वी विक्रमी ₹1,83,000 (प्रति 10 ग्रॅम) वर पोहोचलेले सोने आता थेट ₹1,47,000 च्या आसपास आले आहे. एकाच दिवसात सोन्याच्या दरात सुमारे 30 ते 35 हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर चांदीने तर घसरणीचे सर्व विक्रम मोडले आहेत. चांदीच्या दरात 27% ते 36% पर्यंत कपात झाली असून, ₹4 लाखांच्या ऐतिहासिक उच्चांकावरून चांदी आता ₹2.70 लाख प्रति किलोवर आली आहे.
advertisement
लग्नसराईसाठी 'सुवर्णसंधी'
लग्नाच्या बस्त्यात सर्वात मोठा खर्च हा दागिन्यांचा असतो. सोन्याचे भाव 1.80 लाखांच्या पार गेल्याने अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी दागिने खरेदी पुढे ढकलली होती. मात्र, आता सोन्याचे भाव दीड लाखाच्या खाली आल्याने लग्नाचे बजेट पुन्हा एकदा आवाक्यात आले आहे. एका तोळ्यामागे सुमारे 35 हजार रुपयांची बचत होत असल्याने, ज्यांना 5 तोळे सोने घ्यायचे आहे, त्यांचे थेट 1.5 लाख ते 1.75 लाख रुपये वाचणार आहेत. लग्नात चांदीची भांडी किंवा भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. चांदीचे भाव 1.30 लाखांनी कमी झाल्यामुळे चांदीच्या वस्तूंची खरेदी आता पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा की संधी?
एकदाच झालेली ही मोठी घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेची असली तरी, नवीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही 'बाय ऑन डिप'ची सर्वोत्तम संधी मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, लग्नसराईची मागणी वाढल्यास हे दर पुन्हा सावरू शकतात, त्यामुळे खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे. अन्य महत्त्वाचे टॅक्स नियम म्हणजे सोन्याचे दागिने किंवा नाणी 24 महिन्यांपेक्षा जास्त काळ जवळ ठेवल्यानंतर विकल्यास 12.5% दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होईल.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
बजेटमुळे मोठा बदल! ऐन लगीन सराईत सरकारने दिली गुड न्यूज? सोनं आणि चांदीच्या दरात किती घसरण?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement