Summer Tips : उन्हाळ्यात तुमचं शरीराचं बनेल AC! प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट रायनने दिल्या 5 सिम्पल समर टिप्स..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
या काळात आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आणि आहारात आवश्यक बदल करणे गरजेचं असतं. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट रायन फर्नांडो यांनी उन्हाळ्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत
मुंबई : एप्रिल पासूनच कडक उन्हाळा सुरू झाला आहे. एप्रिलचा पहिलाच आठवडा सुरू असताना राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. त्यामुळे उष्णता आणि गर्मी झपाट्याने वाढत आहे. उष्णतेमुळे शरीरात डिहायड्रेशन मोठ्या प्रमाणात होतं. तसेच विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवतात.
या काळात आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आणि आहारात आवश्यक बदल करणे गरजेचं असतं. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट आणि हेल्थ कोच रायन फर्नांडो यांनी उन्हाळ्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं शरीरच एसी बनेल आणि तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही असं त्यांनी सांगितलंय. रायन फर्नांडो यांनी उन्हाळ्यात 5 महत्त्वाच्या टिप्स फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
अडीच ते तीन लिटर पाणी प्या
रायन फर्नांडो यांनी सांगितले की, उन्हाळ्यात रोज किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते.
आहारात या पदार्थांचा समावेश करा.
याशिवाय उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळपाणी, ताक आणि लिंबू पाणी प्या. आहारात टरबूज, काकडी, खिरा आणि खरबूज या फळांचा समावेश करा. यामुळे तुमचं शरीर एसी बनेल आणि नैसर्गिकरित्या थंड राहील असेही ते म्हणाले.
advertisement
तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा
याशिवाय उन्हाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ न खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
कारण उन्हाळ्यात पचनक्रीया मंदावते. पोट खराब होते आणि अल्सरचा धोका वाढतो. त्यामुळे इलेक्टोलाइट्स आवश्यक असतात.
इलोक्ट्रोलाइट किंवा होममेड ओआरएस घ्या
उन्हाळ्यात गर्मीमुळे घाम येतो आणि घामामुळे शरीरातून सोडियम आणि पोटॅशियम निघून जातात. त्यामुळे एक चांगले इलोक्ट्रोलाइट किंवा होममेड ओआरएस घ्या असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
advertisement
advertisement
लंचमध्ये हलका आहार घ्या
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी जठराग्नी मंदावतो त्यामुळे लंच हलका ठेवा. लंचमध्ये तुम्ही फळं आणि भाज्यांचा समावेश करू शकता. भात किंवा डाळी देखील लंचमध्ये घेऊ शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 5:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Tips : उन्हाळ्यात तुमचं शरीराचं बनेल AC! प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट रायनने दिल्या 5 सिम्पल समर टिप्स..








