Chaitra Navratri 2025 Upay: लग्नाचं कुठंच काय जुळेना? चैत्र नवरात्रीमध्ये करून घ्या हे प्रभावी उपाय, दिसेल परिणाम

Last Updated:

Chaitra Navratri 2025 Upay: नवरात्रीच्या नऊ पवित्र दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात पूजा किंवा प्रार्थना केल्यास ती फलदायी ठरते. तुमच्या लग्नाला उशीर होत असेल, लवकर लग्न व्हावे यासाठी नवरात्रीत करण्याचे उपाय..

News18
News18
मुंबई: नवरात्रोत्सव वर्षातून चार वेळा साजरा केला जातो, ज्यामध्ये चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र, आणि दोन गुप्त नवरात्रांचा समावेश होतो. या नऊ पवित्र दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात पूजा किंवा प्रार्थना केल्यास ती फलदायी ठरते. तुमच्या लग्नाला उशीर होत असेल, लवकर लग्न व्हावे यासाठी नवरात्रीत करण्याचे उपाय ज्योतिषी रवी पराशर सुचवले आहेत.
लग्न जुळण्यासाठी उपाय:
नवरात्रीत माता कात्यायनीची पूजा विशेषतः फलदायी मानली जाते. तसेच, इच्छित विवाहासाठी दुर्गेची पूजा केली जाते. खऱ्या भक्तिभावाने देवीची पूजा केल्यास जीवनातील प्रत्येक अडचण दूर होऊ शकते.
२४ वर्षांपर्यंतच्या लोकांसाठी उपाय: नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी लाल कपडे घालावेत. देवी दुर्गेला तुमच्या वयाइतक्या लवंगाचा नैवेद्य दाखवावा. मनात "ॐ दुं दुर्गायै नमः" हा मंत्र जप करावा. पूजा संपल्यानंतर लग्नासाठी देवीला प्रार्थना करावी. अर्पण केलेल्या लवंगा प्रसाद म्हणून सेवन कराव्या. असे केल्याने लग्न लवकर होईल आणि समस्याही दूर होतील.
advertisement
२५ ते ३० वर्षे वयोगटातील लोकांसाठी उपाय: तुमचे वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असेल आणि लग्नाला उशीर होत असेल तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी लाल कपडे घालावेत. देवी मातेला जास्वंदीची फुले अर्पण करावीत. कात्यायनी मातेच्या मंत्राचा जप करावा. पूजा केल्यानंतर लग्नासाठी देवीला प्रार्थना करावी. हा उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री करता येतो.
advertisement
३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी उपाय: तुमचे वय ३० वर्षे किंवा त्याहून अधिक असेल आणि प्रयत्न करूनही लग्न जुळत नसेल तर नवरात्रीच्या शेवटच्या रात्री स्नान करून देवीच्या प्रार्थनेत बसावे. एक लाल चुनरी घ्यावी आणि त्यात 2 हळकुंड आणि एक चांदीचे नाणे ठेवावे. ते देवीला समर्पित करावे. यानंतर दुर्गा सप्तशतीचा चौथा अध्याय पठण करावा. लग्न व्हावे म्हणून देवीची प्रार्थना करावी. प्रार्थनेनंतर हळकुंड आणि चांदीचे नाणे त्याच चुनरीत गुंडाळून बांधावे आणि बेडरूममध्ये ठेवावे. या उपायाने देवी मातेच्या कृपेने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Chaitra Navratri 2025 Upay: लग्नाचं कुठंच काय जुळेना? चैत्र नवरात्रीमध्ये करून घ्या हे प्रभावी उपाय, दिसेल परिणाम
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement