Ram Mandir : ईस्ट इंडिया कंपनीचं 161 वर्ष जुनं नाणं; नाण्यावर श्रीरामांचा दरबार, पाहा Video

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका व्यक्तीकडे तब्बल 161 वर्ष जुनं असं श्रीरामांचं मूर्ती असलेलं नाणं आहे. त्यावरती श्रीरामांचा दरबार कोरलेला आहे. 

+
News18

News18

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर : 22 जानेवारीला अयोध्यामध्ये श्री राम लाल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये सध्या राममय वातावरण झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिक रमेश कोंदलकर यांच्याकडे तब्बल 161 वर्ष जुनं असं श्रीरामांचं मूर्ती असलेलं नाणं आहे. त्यावरती श्रीरामांचा दरबार कोरलेला आहे.
शहरातील संजय नगर भागात राहणारे रमेश कोंदलकर यांच्याकडे ईस्ट इंडिया कंपनीने 1862 मध्ये जाहीर केलेलं नाणं आहे. या नाण्यामध्ये श्रीरामांचा दरबार असलेला एक चित्र कोरण्यात आलेले आहे. हे नाणं गेल्या 161 वर्षांपासून कोंदलकर परिवार यांच्याकडे आहे. ते अनेक वर्षांपासून या नाण्याची मनोभावी पूजा अर्चा करतात. त्यांच्याकडे अनेक नाण्यांचा संग्रह आहे त्यामध्येच हे एक नाणं होतं, असे कोंदलकर यांनी सांगितलं.
advertisement
कसं आहे नाणं?
या नाण्यामध्ये श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण यांची उभी मूर्ती आहे आणि त्यांच्या पाया शेजारी हनुमान हाताला नमस्कार करताना बसलेला दिसत आहे. याच बरोबर कोंदलकर यांचाकडे तब्बल पाच दशकांपासून एक पंचधातूंची हनुमानाची मूर्ती आहे. त्या मूर्तीची पण गेल्या पाच पिढ्यांपासून मनोभावे पूजा अर्चा केली जात आहे.
advertisement
प्रायश्चित्त पुजेने सुरु होणार प्राणप्रतिष्ठा, अनुष्ठानाला सुरुवात; कसे आहेत 22 जानेवारीपर्यंतचे कार्यक्रम
माझ्या आईच्या वडिलांनी ही मूर्ती मला दिलेली आहे. आमची ही पाचवी पिढी आहे. मी सुद्धा या मूर्तीला दररोज जल अभिषेक करून पूजा करतो. ही मूर्ती उभी आहे आणि आशीर्वाद देण्यासाठी हनुमानाने हात वर केलेले आहेत. जर कोणत्या लहान मुलाला भीती वाटत असेल किंवा झोपेमध्ये जर कुणाला वाईट स्वप्न पडत असेल तर आम्ही अभिषेक केलेलं पाणी हे त्यांना प्यायला देतो. त्यामुळे ज्यांना कोणाला वाईट स्वप्न पडत असेल त्यांना हे पाणी पिल्यानंतर स्वप्न पडत नाहीत, असं दावा कोंदलकर यांनी केला आहे.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir : ईस्ट इंडिया कंपनीचं 161 वर्ष जुनं नाणं; नाण्यावर श्रीरामांचा दरबार, पाहा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement