Shri Ram Good Qualities : मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या चारित्र्यातील हे 5 गुण अंगीकारा, जीवन यशस्वी होईल..

Last Updated:

भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. प्रभू राम यांनी सुखाशी तडजोड करून न्याय आणि सत्याचा मार्ग अवलंबला. या गुणांमुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे संबोधण्यात आले. प्रभू रामाच्या अनेक गुणांपैकी काही गुण अंगीकारले तर आपले जीवन नक्कीच यशस्वी होऊ शकते.

News18
News18
मुंबई : माणूस आपल्या गुण आणि कृतीतूनच आपली ओळख निर्माण करतो. प्रभू राम यांना त्यांच्या स्वभाव, गुण आणि कर्तृत्वामुळे मर्यादा पुरुषोत्तम असे संबोधले जाते. प्रभू राम हे श्री हरी विष्णूचे अवतार आहेत असेही मानले जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन एक आदर्श पुरुष आणि मर्यादा पुरुषोत्तम असे केले आहे. त्यांनी राज्य सोडले आणि 14 वर्षे वनवास भोगला. पण तरीही त्यांना महान राजा म्हटले जाते. कारण प्रभू रामचंद्रांनी सत्य, दया, करुणा, धर्म आणि प्रतिष्ठेच्या मार्गावर राज्य केले.
आजही जेव्हा वडिलधारी मंडळी संस्कृती आणि नैतिकतेची चर्चा करतात तेव्हा प्रभू राम यांचे नाव आधी घेतले जाते. प्रभू राम अनेक गुणांनी संपन्न आहेत. पण जर तुम्ही त्याचे केवळ 5 गुण जीवनात अंगीकारले तर आपले जीवन यशस्वी होऊ शकते. असे म्हणतात की, प्रत्येक माणसामध्ये प्रभू रामचंद्राचे हे 5 गुण असणे आवश्यक आहे. चला प्रभू राम यांच्या या गुणांबद्दल जाणून घेऊया दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह जी यांच्याकडून.
advertisement
प्रभू रामचंद्रांचे हे गुण अंगीकारण्याचा करा प्रयत्न..
धैर्य : सहनशीलता आणि संयम हा धीर असलेल्या भगवान श्रीरामांच्या विशेष गुणांपैकी एक आहे. आजकाल लोकांमध्ये संयम खूप कमी झाला आहे. त्यांना सर्वकाही पटकन आणि सहज मिळवण्याची सवय लागतेय. मग ते पैसे असो वा यश. या तत्परतेमुळे लोकांना पुढे जाता येत नाही. श्री रामांनी १४ वर्षे वनवासात घालवले, समुद्रावर पूल बांधण्यासाठी तपश्चर्या केली. मत सीतेचा त्याग केल्यानंतर राजा असूनही श्री राम साधूसारखे जगले. प्रभू रामाप्रमाणे आजही प्रत्येक व्यक्तीमध्ये सहनशीलतेचा हा गुण असला पाहिजे.
advertisement
दयाळूपणा : केवळ एक दयाळू व्यक्ती समाजात योग्य मानसन्मान मिळवू शकते. मनुष्याने सर्वांशी दयाळू वागले पाहिजे. या गुणामुळे प्रभू रामाने सर्वांना आपल्या संरक्षणात घेतले. भगवान रामाने स्वतः राजा असूनही सुग्रीव, हनुमानजी, केवट, निषादराज, जांबवंत आणि विभीषण यांना वेळोवेळी नेतृत्वाचे अधिकार दिले.
नेतृत्व क्षमता : प्रभू राम राजा आणि कार्यक्षम व्यवस्थापक असूनही सर्वांना सोबत घेऊन गेले. या नेतृत्व क्षमतेमुळे समुद्रात दगडांनी पूल बांधता येणे शक्य झाले.
advertisement
आदर्श भाऊ : आज प्रत्येक घरात भावा भावांमध्ये भांडणे होतात. कुटुंबातील कलहाचे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. ज्या घरात भावांची मैत्री असते, त्या घरात संपूर्ण कुटुंब आनंदी राहते. यासाठी प्रभू राम यांच्यासारख्या आदर्श भावाची भूमिका निभावण्याची गरज आहे. राम याचे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यावरील प्रेम, त्याग आणि समर्पण यामुळेच त्यांना आदर्श भाऊ म्हटले जाते.
advertisement
मैत्रीचे गुण : प्रभू रामाने मैत्रीचे नाते मनापासून जपले. केवट, सुग्रीव, निषादराज आणि विभीषण हे सर्व त्याचे परम मित्र होते. मैत्री टिकवण्यासाठी प्रभू रामांनी स्वतः अनेक संकटांचा सामना केला.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Shri Ram Good Qualities : मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या चारित्र्यातील हे 5 गुण अंगीकारा, जीवन यशस्वी होईल..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement