मानलं गड्या! बारावीच्या विद्यार्थ्याची कमाल, 2 हजार वर्षापूर्वीच्या लिपीत लिहिली भगवद्गीता!
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Bagavad Gita: छत्रपती संभाजीनगरमधील एका 12वीच्या विद्यार्थ्याने चक्क 2000 वर्षांपूर्वीच्या ब्राह्मी लिपीत भगवद्गीता लिहिली आहे. त्याच्या या कामगिरीचं कौतुक होतंय.
छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या काळात तरुणाई समाज माध्यमांच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळते. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणाने मोठी कामगिरी केलीये. श्रीकांत गोरे याने सुमारे 2 हजार वर्षांपूर्वीची सम्राट अशोक आणि सम्राट मौर्यांच्या काळात वापरली जाणारी ब्राह्मी लिपी आणि मराठा साम्राज्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरली जाणारी मोडी लिपी या दोन्ही लिपींचा अभ्यास करून संपूर्ण भगवद्गीता लिहिली आहे.
पाच दिवसात शिकला ब्राह्मी
“ ब्राह्मी लिपी शिकायला पाच दिवस लागले तर मोडी लिपी शिकण्यासाठी दहा दिवसात लागले. लिपीचा अभ्यास केल्यानंतर काहीतरी लिहावे असे वाटू लागले. तेव्हा आठवले की धर्मशास्त्रात भगवद्गीता या ग्रंथाला खूप मोठा मान आहे. त्यामुळे भगवद्गीता मोडी लिपीत 60 पानांची तर ब्राह्मी लिपीत जवळपास 65 पानांची लिहिली. तसेच दोन्ही लिपींचा अभ्यास वडील विठ्ठल गोरे यांना असल्यामुळे त्यांच्याकडून या लिपिंचा अभ्यास आणि शिक्षण घेतले,” असे श्रीकांतने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
वडीलच श्रीकांतचे गुरू
इतिहास जाणून घेणे आजच्या युगात महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही विविध पत्रांसाठी मोडी लिपीचा वापर केला जायचा. लिपींचा अभ्यास केल्यावरच इतिहास समजतो. त्यामुळे मोडी आणि ब्राह्मी लिपीचा अभ्यास केला. इतिहास जाणून घेण्याची आवड असल्यामुळे या लिपींचे ज्ञान अवगत झाले आणि माझ्या मुलाला देखील मोडी आणि ब्राह्मी लिपी शिकवली, असे विठ्ठल गोरे यांनी सांगितले.
advertisement
तरुणांपुढे अनोखा आदर्श
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, अनेकजण आपल्या ऐतिहासिक वारशापासून दूर जात आहेत, त्यातच श्रीकांतने आपल्या प्राचीन लिपी आणि संस्कृतीशी नाते जोडून एक वेगळाच मार्ग निवडला आहे. त्याच्या या प्रयत्नाने केवळ प्राचीन लिपींचे महत्त्व अधोरेखित होत नाही, तर तरुणांना आपले ज्ञान आणि कौशल्ये सकारात्मक कामांसाठी वापरण्याची प्रेरणा देखील मिळते. त्याची ही अनोखी कामगिरी निश्चितच त्याला भविष्यात अशाच प्रकारच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रकल्पांसाठी प्रोत्साहित करेल.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jul 12, 2025 2:36 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
मानलं गड्या! बारावीच्या विद्यार्थ्याची कमाल, 2 हजार वर्षापूर्वीच्या लिपीत लिहिली भगवद्गीता!






