advertisement

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा उपवास करताय? मग भगवान शंकराला महामृत्युंजय का म्हणतात?

Last Updated:

भगवान शंकराला महामृत्युंजय असंही म्हटलं जातं. मृत्यूवर विजय मिळणारा आणि ज्याच्यावर मृत्यूचा कोणताही परिणाम होत नाही असा महामृत्युंजय शब्दाचा संस्कृत अर्थ होतो.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक देवतेची अनेक नावं आहेत. भगवान शंकर यांचीदेखील अनेक नावं आहेत. नीळकंठ, महादेव, अर्धनारीनटेश्वर ही त्यापैकीच काही नावं होय. याशिवाय शिवशंकर, भोलेनाथ या नावांनीदेखील त्यांचं स्मरण केलं जातं. भगवान शंकराला ही नावं का दिली गेली असावीत, असा प्रश्न भक्तांच्या मनात आला असेलच. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या वेगवेगळ्या नावांचा महिमा आहे.
सनातन धर्मात भगवान शंकर हे विश्वाचे संहारक म्हणून ओळखले जातात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यातेल ते महेश म्हणजे एक प्रमुख देवता आहेत. भगवान शंकर शिवशंकर, भोलेनाथ या नावांनीदेखील परिचित आहेत. हिंदू धर्मानुसार, भगवान शंकराला महादेव ही उपाधी दिली गेली आहे. इतर कोणत्याही देवतेला ही उपाधी मिळालेली नाही. कारण विश्वाच्या निर्मितीपूर्वी भगवान शंकर अस्तित्वात होते आणि विश्वाच्या समाप्तीनंतरही ते कायम राहतील, असं मानलं जातं. महादेव म्हणजे महान दैवी शक्ती असलेले किवा देवांचे देव होय. त्यामुळे भगवान शंकरच महादेव असू शकतात.
advertisement
भगवान शंकराने रौद्र रूप धारण केलं तर तिन्ही लोक भयभीत होतात. भोलेनाथ हे त्यांचं दुसरं रूप आहे. कोमल हृदय आणि दयाळूपणा असा भोलेनाथ शब्दाचा अर्थ आहे. भगवान शंकर केवळ शुद्ध मनाने शिवलिंगावर अभिषेक करणाऱ्या भक्तावर प्रसन्न होतात. त्यामुळे त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातं.
पौराणिक कथांनुसार, जेव्हा देव आणि दानव म्हणजे राक्षसांमध्ये अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन झालं तेव्हा त्यातून विष निर्माण झालं. हे विष इतकं भयंकर होतं की त्यामुळे दहा दिशांना आग लागली. तेव्हा विश्वरक्षणासाठी भगवान शंकरानं विषपान केलं. त्या विषामुळे शंकराचा गळा निळा पडला. त्यामुळे भगवान शंकर हे नीळकंठ या नावाने ओळखले जातात.
advertisement
भगवान शंकराला महामृत्युंजय असंही म्हटलं जातं. मृत्यूवर विजय मिळणारा आणि ज्याच्यावर मृत्यूचा कोणताही परिणाम होत नाही असा महामृत्युंजय शब्दाचा संस्कृत अर्थ होतो. भगवान शंकराच्या स्तुतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो. या मंत्राच्या जपानं अकाली मृत्यूचं संकट दूर होतं असं मानलं जातं. अर्धनारीश्वर अर्थात अर्धनारीनटेश्वर हेदेखील भगवान शंकराचं रुप आहे. यात महादेवाचं अर्ध शरीर स्त्रीचं तर अर्ध पुरुषाचं आहे. भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर रूपाच्या अर्ध्या भागात भगवान शिव पुरुष रूपात, तर उर्वरित अर्ध्या भागात शक्ती स्त्री रूपात वास करतात. या रूपातून भगवान शंकर भक्तांना स्त्री आणि पुरुष एकमेकांसाठी पूरक असून ते एकमेकांविना अपूर्ण आहे, असा संदेश देतात.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा उपवास करताय? मग भगवान शंकराला महामृत्युंजय का म्हणतात?
Next Article
advertisement
सोन्या, चांदीने खरे रंग दाखवले, ओव्हरसोल्डनंतर दिला सर्वात मोठा झटका; वर्ल्ड मार्केटमध्ये उलथापालथ, गुंतवणूकदारांची धडधड वाढली
सोन्या, चांदीने खरे रंग दाखवले; ओव्हरसोल्डनंतर दिला सर्वात मोठा झटका
  • सोनं-चांदीत ऐतिहासिक उसळी, गुंतवणूकदार थक्क

  • ग्लोबल मेटल मार्केटमध्ये खळबळ

  • 2008 नंतरचा सर्वात मोठा सोन्याचा झटका

View All
advertisement