Vaishakh Purnima 2025: वैशाख पौर्णिमेला स्नान अन् दानाचं महत्त्व, कोणत्या राशीसाठी कोणतं दान फायद्याचं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Vaishakh Purnima 2025: ज्योतिषशास्त्रात बुद्ध पौर्णिमेला स्नान आणि दानाचे महत्त्व सांगितले आहे. तुमच्या राशीनुसार कोणतं दान फायद्याचं ठरतं? हे जाणून घेऊ.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक: दरवर्षी येणारी वैशाख पौर्णिमा यंदा 12 मे रोजी येत आहे. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. सनातनी हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी शास्त्रात स्नान आणि दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केला जातो. या दिवशी उपवास करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. तसेच पिंपळाच्या झाडाला देखील पाणी अर्पण करण्याची प्रथा या दिवशी आहे.
advertisement
यंदाच्या वैशाख पौर्णिमेला राशीनुसार ज्योतिष शास्त्राने सुचवलेले दान केल्यास आपल्याला आपल्या राशीनुसार विविध फळ प्राप्ती होते. याबाबत नाशिक येथील शास्त्र अभ्यासक अमोघ पाडळीकर यांनी लोकल18 च्या माध्यमातून माहिती दिलीये.
कुणी काय दान करावं?
मेष - या राशीच्या लोकांनी पौर्णिमेच्या पर्वकालामध्ये जलदान करावे. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात जलदान करण्यासारखे दुसरे पुण्य कर्म नाही. यासाठी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपण पाणपोई, माठ, पशु पक्ष्यांसाठी पाण्याचा छोटासा हौद बांधून पुण्याचे भागीदार होऊ शकता. असे केल्यास उत्तम धनलाभ देखील होईल.
advertisement
तूळ - ही रास शुक्र प्रधान राशी आहे. या राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सावली देणारी झाडे लावावीत. अर्थात शक्य तेवढे वृक्षारोपण करावे आणि इतरांनाही प्रवृत्त करावे.
कन्या - कन्या राशीचे लोक अनाथाश्रम किंवा बालआश्रमात शैक्षणिक उपयोगी गोष्टी दान करू शकतात. वह्या- पुस्तक तसेच पंखा, कुलर किंवा धान्याचे दानही शुभ सिद्ध होईल. हे केल्याने उत्तम वैभव प्राप्त होईल.
advertisement
सिंह - ही रास अग्नितत्वाची राशी आहे. त्यामुळे या राशीला राज राशी असे देखील संबोधले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी गरीब लोकांना शिधा अर्थात कोरे, न शिजवलेले धान्य दान करणे हे विशेष फलदायी ठरते. दान देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या मनोकामना पूर्ण होतात. तसे यश देखील प्राप्त होते.
मिथुन - ही रास बुधाची प्रिय रास आहे .ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी गरीब लोकांना आंबा, टरबूज, खरबूज इत्यादी हंगामी फळांचे दान करावे. यामुळे ह्या राशीच्या लोकांना यश प्राप्तीस मदत होईल.
advertisement
वृषभ - या राशीच्या लोकांनी आगामी पावासाळ्याच्या दृष्टीने गरजू व्यक्तींना पावसाळी चपला, बूट, छत्री इत्यादी वस्तूंचे दान करावे.
कुंभ - वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गरजूंना सुती कपडे दान करावे. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. या राशींच्या लोकांना सध्याचा कालखंड अत्यंत शुभ आहे. ही पौर्णिमा त्यांच्यासाठी भरभरून आनंद वाढवणार आहे.
advertisement
Solapur : जुळून आले दिव्यांग आणि दृष्टीहिन जोडप्यांचे रेशीमबंध, सोलापुरात पार पडला अनोखा विवाह सोहळा
मकर - ही रास शनी तत्त्वाची राशी आहे. या मुळे या राशीच्या लोकांनी भूतदया दाखवली पाहिजे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पशु-पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करावी. त्यांच्या रूपाने त्रिदेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
कर्क - या राशीच्या लोकांनी गरजू लोकांना छत्री दान करावी. तसेच कोणाला आवश्यक असल्यास एखादे विश्रांती स्थान उभारावे. उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तूंचे दान केल्याने भगवान विष्णूची कृपा कायम राहते, असे मानले जाते.
advertisement
धनु -ही रास गुरु तत्वाची आहे. या राशीच्या लोकांनी धार्मिक स्थळांबाहेर तसेच एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर थंड पाण्याची व्यवस्था करणे फायदेशीर ठरेल. दुसऱ्यांची तहान भागवल्याने तुमच्याही जीवनात गारवा कायम राहील.
वृश्चिक - या राशीच्या लोकांची गुरु हा परीक्षा घेत आहे. त्यामुळे यांनी आरोग्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे घातक आहे. या दिवशी गरजू व्यक्तींना ऋतुमानाप्रमाणे पिकणाऱ्या फळांचे दान करणे शुभ मानले जाते.
मीन - या राशीच्या स्वामी हा गुरु सांगितला आहे. या राशीच्या लोकांनी यात्रेकरूंसाठी भोजन आणि पाण्याची व्यवस्था करावी. तीर्थक्षेत्री जाणाऱ्या लोकांना शिधा किंवा भोजनासाठी उपयुक्त अन्नाचे दान करावे.
तुमच्या राशीनुसार ज्योतिषशास्त्रात सांगितलेला दानधर्म केल्यास फायदा होईल. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला यश प्राप्ती होणार असल्याचे अमोघ पाडळीकर गुरुजी यांनी सांगितले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
May 11, 2025 2:52 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vaishakh Purnima 2025: वैशाख पौर्णिमेला स्नान अन् दानाचं महत्त्व, कोणत्या राशीसाठी कोणतं दान फायद्याचं?