Solapur : जुळून आले दिव्यांग आणि दृष्टीहिन जोडप्यांचे रेशीमबंध, सोलापुरात पार पडला अनोखा विवाह सोहळा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापुरात दिव्यांग वधू-वरांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळात दृष्टीहीन आणि दिव्यांग वधू-वरांचे रेशीमबंध जुळले आहे.
सोलापूर :- सोलापूर शहरातील शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीने दिव्यांग वधू-वरांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळात दृष्टीहीन आणि दिव्यांग वधू-वरांचे रेशीमबंध जुळले आहे. या संदर्भात अधिक माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन हुंडेकरी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापूर शहरात गेल्या आठ वर्षांपासून सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळ्याचे मोफत आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी दिव्यांग मुला-मुलींचा विवाह सोहळा त्यांनी आयोजन केला आहे. या विवाह सोहळ्यात 3 दिव्यांग जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. अनिकेत काची - सायली बागडे, अमर म्हंता - मंगला संभारम, वैभव वाघमारे - शुभांगी साठे असे विवाह झालेल्या दिव्यांग मुला-मुलींची नावे आहेत.
advertisement
तसेच या दिव्यांग जोडप्यांना स्वयंपाक घरातील भांडी, देवघरातील साहित्य आणि घरातील विविध वस्तू अशा अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. विवाह सोहळ्यामधील दिव्यांग बांधवांना घरी बसून काम करता यावे यासाठी सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन, फिरता स्टॉल देण्यात आले.
advertisement
गेल्या 8 वर्षांपासून हा सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येत असून याद्वारे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यंदा 03 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत. विवाह सोहळ्याकरिता आलेल्या मान्यवरांचे भरभरून प्रेम पाहून आणि आपुलकीने दिलेल्या शुभेच्छांनी वधू-वरांच्या डोळ्याच्या कडा आनंदाश्रूंनी पाणावल्या होत्या.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 11, 2025 10:11 AM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Solapur : जुळून आले दिव्यांग आणि दृष्टीहिन जोडप्यांचे रेशीमबंध, सोलापुरात पार पडला अनोखा विवाह सोहळा