लग्नात वारंवार अडचणी येत असतील तर वापरा सोपे उपाय, झटपट होईल शुभमंगल!

Last Updated:

ज्योतिष शास्त्राच्या काही उपायांमुळे तुम्हाला लवकरच विवाहयोग्य आणि मनासारखा जोडीदार मिळू शकेल. 

वडीलच करतात मुलीसोबत लग्न
वडीलच करतात मुलीसोबत लग्न
मुंबई, 15 सप्टेंबर : जर काही कारणास्तव तुमच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा तुम्हाला मनासारखा साथीदार मिळत नसेल तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. ज्योतिष शास्त्राच्या काही उपायांमुळे तुम्हाला लवकरच विवाहयोग्य आणि मनासारखा जोडीदार मिळू शकेल.
हिंदू पंचागानुसार,  प्रत्येक वर्षाच्या भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरतालिकेचं व्रत ठेवलं जातं. यंदाच्या वर्षी 18 सप्टेंबर रोजी हरतालिकेचं व्रत आहे. या दिवशी सुवासिनी महिला सुख-सौभाग्य आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत ठेवतात. तर कुमारी तरुणी मनपसंत जीवनसाथीसाठी हरतालिकेचं व्रत करतात. अयोध्याचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी सांगितलं की, हरतालिकेच्या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या सुख-समृद्धीसह दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. इतकच नाही तर कुमारीकादेखील हरतालिकेचं व्रत करतात, चांगला नवरा मिळावा ही त्यामागील इच्छा असते. मात्र अनेकदा वारंवार लग्न तुटलं जातं, किंवा मनासारखा नवरा मिळत नाही. अशावेळी हरतालिकेचं व्रत करताना काही गोष्टींचं कटाक्षानं पालन करावं.
advertisement
अशा दूर होतील अडचणी...
जर तुमच्या लग्नात वारंवार अडचणी येत असतील, किंवा मनासारखा पार्टनर मिळण्यात अडथळा येत असेल तर हरतालिकेचं व्रत करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. हरतालिकेच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर स्नान केल्यानंतर पवित्र नदींच्या मातीने शिवलिंग तयार करावा. या शिवलिंगाची विधीवत पूजा करावी. याशिवाय शिवलिंगावर 21 बेलपत्र अर्पण करावे आणि 11 वेळा त्या शिवलिंगाची परिक्रमा करावी. जर तुम्ही या गोष्टींचं नीट पालन केलं तर तुमच्या लग्नात येणारे अडथळे दूर होती आणि मनासारखा जोडीदार मिळेल.
advertisement
नंदी हे भगवान शंकर यांचं वाहन आहे. तुम्ही कोणत्याही शिवमंदिरात गेलात की तिथं नंदीची मूर्ती नक्की आढळते. ‘मी जिथं बसेन तिथं तू ही असशील’, असं वरदान शंकरानंच नंदीला दिलं होतं. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात नंदीची मूर्ती आढळते. शिवमंदिरात गेल्यावर अनेक जण शिवाची पूजा करण्याबरोबरच नंदीची पूजाही करतात. त्याचवेळी आपल्या मनातील इच्छा नंदीच्या कानात सांगण्याची पद्धत आहे. नंदीच्या कानात ही इच्छा का सांगावी? त्याचबरोबर ती सांगण्याची काय पद्धत आहे? याबाबत पुण्यातल्या विद्याधर काळे गुरुजी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
काय आहे परंपरा?
‘भगवान शंकर सर्वाधिपदी आहेत. नंदिकेश्वर म्हणजेच नंदी हे शंकराचे वाहन आहे. नंदिकेश्वर म्हणजे पूर्वजन्मीचे श्रीपादस्वामी. महामुनी श्रीपादस्वामी हे महादेवाचे निश्चिंत भक्त होते. पूर्वजन्मी त्यांनी महादेवाची मोठी तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न केले. शंकराला प्रसन्न केल्यानंतर श्रीपाद स्वामी यांनी त्यांच्याकडे एक वर मागितला ज्या त्यांनी की मला तुमच्याजवळ आढळ स्थान म्हणजेच कायम स्वरूपी स्थान पाहिजे.
advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
लग्नात वारंवार अडचणी येत असतील तर वापरा सोपे उपाय, झटपट होईल शुभमंगल!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement